‘ब्रियर ग्रिल्स’सोबत ‘थलायवा’ रजनीकांतचा शो ‘इंटू द वाईल्ड’चा टीजर रिलीज (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – प्रसिद्ध शो मॅन व्हर्सेस वाईल्डच्या थीमवर आधारीत सिनेमा इन टू द वाईल्डमध्ये यावेळी बियर ग्रिल्स याच्यासोबत साऊथ सुपरस्टार रजनीकांत दिसणार आहेत. नुकताच शोचा टीजर लाँच करण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून लोकांना टीजरची प्रतिक्षा होती. जेव्हापासून घोषणा झाली होती या शोमध्ये थलायवा दिसणार आहेत तेव्हा पासून चाहत्यांची उत्सुकता वाढली होती. यावेळी या शोचा फोकस इंडियावर आहे. याआधी या शोमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. यानंतर आता रजनीकांत यांची या शोसाठी निवड झाली आहे.

असं सांगितलं जात आहे की, बांदीपूर वाघ अभयारण्यात रजनीकांत यांनी आपली शुटींग पूर्ण केली आहे. शुटींगदरम्यान मंगळवारी त्यांच्या पायाचा घोटा मुरगळला होता. एका नव अधिकाऱ्यानं सांगितलं की, “शुटींग करताना रजनीकांत यांचा तोल गेला आणि त्यांच्या पायाचा घोटा मुरगळला. हातालाही कोपऱ्याच्या खाली थोडं खरचटलं आहे. परंतु आता मात्र ते ठिक आहेत.” यानंतर थलायवा मैसूरवरून रवाना झाले आणि मंगळवारी सायंकाळी चेन्नईला पोहोचले.

चेन्नईमध्ये पत्रकारांसोबत बोलताना रजनीकांत यांनी सांगितलं की, बांदीपूरमध्ये शुटींग करताना काट्यांमुळे त्यांना इजा झाली आहे. पीए मोदींनंतर या शोमध्ये दिसणारे रजनीकांत दुसरे भारतीय आहेत. यानंतर आता बॉलिवूड स्टार अक्षय कुमार यासाठी गेला आहे. तो तिसरी व्यक्ती असणार आहे जो असे रोमांचक दृश्ये करताना दिसणार आहे.