निया शर्माचा बोल्ड अवतार पाहून ‘हा’ अभिनेता म्हणाला – ‘हद्द झाली राव…’

पोलिसनामा ऑनलाईन – टीव्हीवरील सुंदर नागिन अ‍ॅक्ट्रेस निया शर्मा (Nia Sharma) फक्त अभिनय नाही तर आपल्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते. निया युथमध्ये खूपच फेमस आहे. जेव्हा फॅशन इंडस्ट्रीबद्दल बोललं जातं तेव्हा नियाचं नाव येणार नाही असं होतच नाही. निया आपल्या हॉट लुकमुळेही अनेकदा चर्चेत आली आहे. नियाचे बोल्ड बिकीनीतील फोटो सोशलवर खूपदा व्हायरल झाले आहेत. पुन्हा एकदा नियानं सोशलवर साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. अभिनेता सुधांशु पांडे यानं तिच्या व्हिडीओवर कमेंट केली आहे.

नियानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती येलो कलरच्या डीप नेक ड्रेसमध्ये दिसत आहे. व्हिडीओत तिचं हॉट क्लीव्हेजही स्पष्ट दिसत आहे. तिचा बोल्ड लुक पाहून अनुपमा मालिकेमधील वनराज म्हणजेच सुधांशु पांडे (Sudhanshu Pandey) यानं कमेंट केली आहे.

 

 

 

 

 

 

 

सुधांशु म्हणतो की, हद्द केली राव या मुलीनं. यानंतर इतर चाहत्यांनी कमेंट करत नियाच्या लुकचं कौतुक केलं आहे. नियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

नियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच निया रवि दुबेचा सुपरहिट शो जमाई राजा 2.0 मध्ये वापसी करणार आहे. 2010 साली आलेल्या काली : एक अग्निपरीक्षा या मालिकेतून तिनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. एक हजारों में मेरी बहना है आणि जमाई राजा या मालिकांनी तिला खूप लोकप्रियता मिळाली आहे. नागिन 4 मालिकेतही तिनं काम केलं आहे. फियर फॅक्टर, खतरों के खिलाडी सिजन 8 मध्ये निया दिसली होती. याशिवाय नियानं ट्विस्टेड(Twisted) या वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.