Jamai Raja 2.0 मध्ये परफेक्ट बिकिनी बॉडीसाठी नियाने दोन दिवस केले होते ‘हे’ काम, अभिनेत्रीने केला खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा आपल्या बोल्ड पर्सनॅलिटीसाठी इंडस्ट्रीमध्ये ओळखली जाते. निया सतत तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे चाहतेही तिचे हे फोटो पाहून दिवाने होतात. सध्या निया तिची वेब सिरीज ‘जमाई राजा 2.0’ च्या दुसर्‍या सीझनच्या तयारीत आहे. ज्यात ती तिचा को-स्टार रवी दुबेसोबत दिसणार आहे. यावेळी, शोमध्ये निया ब्लॅक बिकिनीमुळे जोरदार चर्चेत होती. तिला त्यामुळे ट्रोलही केले गेले होते. यादरम्यान तिने तिच्या जबरदस्त स्टनिंग बिकिनी बॉडी मिळवण्यामागील सत्य उघड केले.

‘एक मुलाखतीदरम्यान निया शर्माने आपल्या बिकीनी शूटविषयी सांगितले. ती म्हणाली , ‘तिने बिकिनी शूटसाठी दोन दिवस काहीही खाल्ले नव्हते. कारण शोसाठी परफेक्ट शॉट द्यायचा होता. इतकेच नाही तिला जो सीन करायचा होता त्याच्या विचाराने ती वेडी झाली होती. तिला आधीपासूनच माहित होते की, असे सीन्स होणार आहेत. त्याचबरोबर तिला शोमध्ये स्वत: ला चांगले दर्शवायचे होते. या शोमध्ये तिला बिकिनी घालावी लागली, यासाठी तिने तिच्या शरीरावर कठोर परिश्रम केले. यानंतर, नियाने त्या काळ्या बिकीनीत तिचे फोटो घेतले आणि ते इंस्टाग्रामवर शेअर केले आणि ते फोटो व्हायरल झाले.

अलीकडेच ‘जमाई राजा 2.0’ चा मुख्य अभिनेता रवी दुबेची पत्नी सरगुन मेहताने निया शर्माच्या बेस्ट किसर्सच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली. वास्तविक, निया शर्मा दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सहभागी झाली होती. या दरम्यान तिने रवी दुबे यांचे सर्वोत्तम किसर असल्याचे वर्णन केले. या शोसाठी या दोघांनी अंडरवॉटर किसिंग सीन शूट केले आहे. नियाची ही चर्चा सोशल मीडियावर बरीच चर्चेत राहिली , आता रवी दुबे आणि त्याची पत्नी सरगुनची प्रतिक्रिया समोर आली आहे. एका मुलाखतीत रवी म्हणाला, ‘जेव्हा आम्ही नियाचा बेस्ट किसर विषयी व्हिडिओ पहिला तेव्हा मी आणि सरगुन हसू लागलो. मी आणि माझी पत्नी दोघांनाही निया खूप आवडते. आम्हाला माहित आहे, ती कशी आहे, तिने जे काही म्हंटले मी ते कॉम्प्लिमेंट म्हणून घेईल. आमच्यामध्ये कुठलाही वाद किंवा नकारात्मकता नाही’ .