Twitter बंद करतंय आपलं लोकप्रिय live-streaming ॲप, ‘हे’ आहे कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फेब्रुवारी 2014 मध्ये, लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी पेरिस्कोप (Periscope) नावाचे प्लॅटफॉर्म लॉन्च केले गेले होते. येथे इव्हेंटला लाईव्ह स्ट्रीम केले जात होते, त्यानंतर वैयक्तिक लाईव्ह स्ट्रीमचा देखील ऑपशन मिळाला. नंतर 2015 मध्ये, मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरने हे ॲप खरेदी केले. आता ट्विटरने जाहीर केले आहे की, हे ॲप 2021 मार्चला रोजी बंद होईल. म्हणजेच पेरिस्कोप संपणार आहे.

2015 मध्ये ट्विटरने पेरिस्कोप विकत घेतले असले तरी त्याने ते कितीला खरेदी केले हे सांगण्यात आले नाही. या अ‍ॅपचे संस्थापक ट्विटरमध्ये प्रॉडक्ट लीड म्हणून काम करत आहे. तथापि, 2015 पासून, आत्तापर्यंत पेरीस्कोपला तसा मोमेंटम मिळवता आला नाही, जो ट्विटरने विकत घेताना अपेक्षित केला होता. सुरुवातीला ट्विटरने पेरिस्कोपला स्वतंत्र अ‍ॅप म्हणून चालवण्याचा प्रयत्न केला. पण नंतर ट्विटरने पेरिस्कोपची वैशिष्ट्ये मर्ज केली.

मार्च 2021 पासून ॲप स्टोअरमधून पेरिस्कोप देखील काढला जाईल. ट्विटरने एका निवेदनात म्हटले आहे की, मागील काही वर्षांपासून त्याचा वापर कमी होत आहे, त्याच्या समर्थनाची किंमत सतत वाढत आहे. जरी कंपनी अ‍ॅप म्हणून पेरिस्कोप बंद करीत आहे, परंतु कंपनीने असेही म्हटले आहे की, ट्विटरमध्ये या अ‍ॅपची मूळ वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. कंपनीने असेही म्हटले आहे की, 2020 पासून काही प्रकल्पांची प्राथमिकता बदलली गेली, अन्यथा याला पहिलेच संपवले गेले असते.

पेरिस्कोप युजर्स त्यांचे लाईव्ह व्हिडिओ डाउनलोड करण्यात सक्षम असतील. पुढच्या रीलिझसह, पेरीस्कोपवर नवीन अकाऊंट तयार करण्यात सक्षम होणार नाहीत. तथापि, मार्च 2021 पासून अ‍ॅप स्टोअर वरून काढला जाईल.