खराब नेटवर्कमध्येही भन्नाट चालणार ट्विटर

वृत्तसंस्था :

भारतीयांकडून इंटरनेटच्या स्पीड बाबत तक्रारी केल्या जातात. त्यामुळे खास भारतीयांकरिता मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफार्म ट्विटरने नवे  अॅप लॉन्च केले आहे.  या अॅप मुळे इंटरनेट चे स्पीड कमी असताना देखील या अॅपद्वारे ट्विटरचा सुलभपणे वापर करता येणार आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात कंपनीने लाइट अॅप सादर करणार असल्याची घोषणा केली होती. सध्या केवळ अॅन्ड्रॉइड वापरकर्त्यांसाठी हे अॅप सुरु करण्यात आले आहे. भारतात इंटरनेटच्या कमी स्पीडमुळे अनेक युजर्सना अडचणींचा सामना करावा लागतो यासाठीच ट्विटर लाइट हे अॅप लॉन्च करत असल्याचं कंपनीने सांगितले . केवळ ३ एमबीच्या या अॅपमुळे डेटा आणि स्पेस दोन्हींची बचत होणार आहे. 2G आणि 3G नेटवर्क लक्षात घेऊन कंपनीने या अॅपची निर्मिती केली आहे.
[amazon_link asins=’B07C4YKR3J,B07D77V1DX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’46c6f373-a088-11e8-b3f3-13851843403f’]
यामध्ये ‘डेटा सेव्हर मोड’चा पर्यायही देण्यात आला असून याद्वारे युजरला कोणते फोटो किंवा व्हिडीओ हवे आहेत तेवढेच ओपन होतील आणि अन्य फोटो किंवा व्हिडीओ ‘ब्लर’ होतील. यापूर्वी, कमी इंटरनेटमुळे होणाऱ्या अडचणींमुळे फेसबुकने मोबाइल अॅपची लाइट आवृत्ती सादर केली आहे,तर स्काइप आणि लिंक्ड-इन यांनी अशाप्रकारची आवृत्ती सादर केली आहे.