Trump यांचे अकाऊंट सस्पेंड झाल्याने Twitter चे मार्केट कॅप 5 बिलियन डॉलरने घसरले, शेयर्समध्ये झाली मोठी घसरण
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड झाल्यानंतर या कंपन्यांच्या शेयर्समध्ये जबरदस्त घसरण दिसून आली आहे. ट्रम्प यांच्या सोशल मीडियावरील निरोपाचा या कंपन्यांवर खोलवर परिणाम झाला आहे. नुकतेच अमेरिकेत झालेल्या हिंसेनंतर ट्विटरने ट्रम्प यांचे पर्सनल अकाऊंट कायमसाठी ब्लॉक केले आहे. या निर्णयानंतर वॉल स्ट्रीटमध्ये ट्विटरच्या शेयरमध्ये सुमारे 12 टक्केपर्यंत घसरण दिसून आली होती. ज्यानंतर कंपनीच्या मार्केट कॅपचे 5 बिलियन डॉलरचे नुकसान झाले आहे.
फेसबुकच्या शेयर्समध्ये सुद्धा झाली घसरण
फेसबुकच्या शेयर्समध्ये सुमारे 4 टक्केची घसरण दिसून आली. शिवाय, मालकी हक्क असणारी कंपनी Alphabet Inc च्या स्टॉक्समध्ये सुद्धा सुमारे 2.31 टक्केचे नुकसान दिसून आले. ट्रम्प यांचे अकाऊंट सस्पेंड झाल्याने मीडिया कंपनीला मोठे नुकसान झाले आहे.
या कंपन्यांचे सुद्धा घसरले शेयर्स –
* नॅस्डॅकवर अमेझॉनच्या शेयर्समध्ये सुमारे 2.15 टक्केची घसरण झाली.
* अॅप्पलच्या स्टॉक्समध्ये सुद्धा सुमारे 2.31 टक्केची घसरण झाली.
* PayPal च्या स्टॉक्समध्ये 2.05 टक्केचे नुकसान झाले.
* अडॉब इंकच्या शेयरमध्ये 2.24 टक्केची घसरण झाली.
का सस्पेंड केले अकाऊंट
ट्रम्प यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की, या सोशल मीडिया नेटवर्क्सने ट्रम्प यांच्यावर अन्याय केला आहे आणि फ्री स्पीचच्या अधिकाराचे उल्लंघन केले आहे यामध्ये ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर खुप नाराजी आहे. अशात या कंपन्या आपले युजर्स गमावू शकतात. कॅपिटल हिल हिंसेनंतर भविष्यात हिंसेची शक्यता पाहता ट्रम्प यांचे अकाऊंट सस्पेंड केले आहे.
2009 मध्ये ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट बनवण्यात आले होते. ट्रम्प यांचे अकाऊंट सस्पेंड होईपर्यंत त्यांचे 8.9 कोटी फॉलोअर होते. याशिवाय डोनाल्ड ट्रम्प 51 लोकांना फॉलो करत होते. मागील 12 वर्षात त्यांनी 57 हजार ट्विट केली आहेत.