तुमच्या Twitter अकाऊंटला ब्लू टिक हवी असेल तर लवकरच करू शकाल ‘अप्लाय’, ‘ही’ आहे प्रक्रिया, जाणून घ्या
नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट Twitter वर दोन पद्धतीचे प्रोफाईल असतात. एक जे ब्लू टिक असते म्हणजे ते व्हेरिफायईड अकाउंट आणि दुसरे नॉन व्हेरिफाईड अकाउंट. अनेक ट्विटर युजरला वाटते, की आपले अकाउंट व्हेरिफाईड आणि ब्लू टिक असावे.
Twitter चे व्हेरिफाईड अकाउंट मिळवण्यासाठी अर्ज करावा लागत होता. मात्र, त्यानंतर ते बंद करण्यात आले होते. सध्या ट्विटर व्हेरिफिकेशन कंपनीकडून स्वत: केले जाते. त्याला अर्जाची गरज नाही. कंपनीने 2018 मध्ये व्हेरिफिकेशनसाठी पब्लिक ऍप्लिकेशन बंद केले होते. मात्र, आता कंपनीने पुन्हा एकदा सुरु होणार आहे. कंपनीने गेल्यावर्षी सांगितले होते, की 2021 पासून पब्लिक व्हेरिफिकेशन येईल. असे असले तरी कंपनीने अजूनही याची घोषणा केली नाही.
वेब डेव्हलपर Jane Manchun Wong ने स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यांनी दावा केला की, व्हेरिफिकेशन रिक्वेस्ट फॉर्मवर सध्या काम केले जात आहे. या स्क्रीनशॉटमध्ये दिसू शकतो.
विविध कॅटेगरी
ऍक्टिव्हिस्ट, सरकारी अधिकारी, पत्रकार आणि इन्फ्यूएन्सर यांसारखी विविध कॅटेगरी आहेत. अर्ज भरण्यासाठी सरकारच्या माध्यमातून जारी केले गेलेले आयकार्ड देणे गरजेचे आहे. याशिवाय तुमचे अकाउंट का व्हेरिफाय करावे, हे सांगणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला काही लिंक्स द्यायला लागेल जिथं तुमच्याबाबत माहिती आहे. न्यूज कव्हरेज किंवा Wikipedia पेज महत्वाचे असू शकते.
पूर्ण प्रक्रिया केल्यानंतर तुम्ही फॉर्म भरून ऑनलाईन सबमिट करू शकाल आणि त्यानंतर ट्विटरच्या रिस्पॉन्सची प्रतिक्षा करावी लागणार आहे. जेव्हा ट्विटरला वाटेल की तुमचा प्रोफाईल व्हेरिफाईड असावे तर तुम्हाला ब्लू टिक मिळेल. नाहीतर तुमचा अर्ज बाद ठरवण्यात येईल. पण काही कालावधीनंतर तुम्हाला पुन्हा अर्ज करता येऊ शकतो.