कौतुकास्पद ! सोलापूरच्या दोघी बहिणींनी CA परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सीए (Chartered Accountant) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. तर यामध्ये सोलापुरातील दोन संख्या बहिणींनी प्रथम प्रयत्नातच यश संपादन केलं आहे. ही परीक्षा जानेवारी महिन्यात घेण्यात आली होती. तर अनुश्री सोनी आणि ऐश्वर्या सोनी असे त्या दोघींचे नावे आहेत. अनुश्रीने सीएच्या परीक्षेत ऑल इंडिया रॅंकिंग- २७ (गुण-५१५) आणि ऐश्‍वर्या रँक- ३९ (गुण-४९६) हे गुण मिळवून त्यांनी यश मिळवलं आहे.

सोलापुर येथील व्यापारी कमलकिशोर सोनी यांच्या या दोन कन्या आहेत. अनुश्री हिने १२ वीमध्ये (विज्ञान) सोलापुरात प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यावेळी नीता अंबानी यांनी तिचे अभिनंदन करून तिला त्यांच्या संस्थेमार्फत इंजिनिअरिंगसाठी शिष्यवृत्ती दिली होती. अनुश्रीने WIT मधून कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग केले असून, त्यानंतर तिने CA फायनल परीक्षेची तयारी केली. तिला पुणे येथील व्ही स्मार्ट इन्स्टिट्यूट, संजय सराफ इन्स्टिट्यूट या संस्थेचे मार्गदर्शन लाभले. सायन्स बॅकग्राउंड असूनही CA परीक्षेत ती सहज प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झाली.

त्याचबरोबर ऐश्वर्या ही आयपीसीसीमध्ये देखील फर्स्ट अटेम्प्टमध्येच क्‍लिअर झाली आहे. तसेच आता लागलेल्या CA परीक्षेच्या निकालात तिनेही प्रथम प्रयत्नात यशस्वी झाली आहे. तसेच मारवाडी समाजाचा व्यवसाय ट्रेंड मोठा असतो. तसेच आमच्या घरच्या व्यवसायामध्ये किंवा समाजातील अनेक उद्योजक, व्यापाऱ्यांना CA च्या माध्यमातून फायदा करून देण्याच्या विचाराने आम्हा दोघी बहिणींनी CA केला आहे, अशी प्रतिक्रिया अनुश्रीने दिली आहे.