एक फूल 2 ‘माळी’ ! दोघांची वरात आली दारात अन् उडाला गोंधळ, पंचायत बसली अन्…

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था –  उत्तर प्रदेश येथील कन्नोज जिल्ह्यामधील एक विचित्र असा प्रकार समोर आला आहे. लग्नावेळी एका नवरी सोबत विवाह करण्यासाठी चक्क दोन नवरदेव हजर होते. त्या नवरीसोबत एक तरुणाचे लग्न ठरल्याने तो वरात घेऊन आला तर, दुसरा म्हणजे त्या नवरीचा प्रियकर सुद्धा तिथे वरात घेऊन आला. एकाच वेळी दारात दोन वराती बघून सगळेच चकित झाले.

पुढे पोलीस ठाणे आणि पंचायती गावात बसल्याने याचा ठोस निर्णय काय असा प्रश्न उभा राहिला. सर्व बोलणी नंतर अखेर त्या मुलीने अर्थात नवरीने तिच्या प्रियकराची निवड केली. तसेच लग्न ठरलेल्या त्या तरुणाचा प्रश्न समोर राहिला. यांच्यानंतर तेथीलच गावातील एका परिवाराने त्यांच्या मुलीचे त्याच्याशी लग्न लावून दिले. या दरम्यान, दारात लग्नाची वरात पोहोचताच सर्वांनी खऱ्या नवरदेवाचे स्वागत केले. सर्व कार्यक्रम सुरु असताना तोच नवरीचा प्रेमी वरात घेऊन तिच्या घराजवळ पोहोचला. त्याला पाहताच नवरीच्या चेहऱ्यावर आनंद मावेनासे झाला. तिने लगेच घरी आलेल्या नवरदेवासोबत लग्नाला नकार दिला. हे समजताच वऱातींनी पोलिसांत धाव घेतली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी नवरी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले. यानंतर दोन्ही पक्षांमध्ये बोलणं होऊ लागले.

अधिक माहिती अशी की, महत्वाचे म्हणजे, त्या प्रियकराचे २३ जूनला लग्न ठरले होते. त्यांनाही कोणीतरी माहिती दिली. ते मंडळी सुद्धा कोतवाली पोलीस ठाण्यात हजर झाले. आणि यांच्या प्रेमविवाहाला विरोध करू लागले. एकाच गावात एकाच स्थळी ४ वधू-वराचे पक्ष आणि पोलीस अशी चर्चा होऊ लागली. अखेर गावची पंचायत बोलावून बोलणं झालं. या बैठकीत नवरीच्या कुटुंबियांनी खऱ्या नवरदेवाने दिलेले दागिने आणि अन्य साहित्य परत केले. नवरदेवाने सुद्धा त्यांच्याकडून घेतलेली बाईक मागे दिली. तसेच, पुढे नवरीच्या प्रियकराने सुद्धा त्याची ज्यांच्याशी पहिला लग्न ठरले होते त्या परिवाराला सामान परत दिले. तसेच चारही पक्षांमध्ये समजुतीने ठरलेली विवाह रद्द केला गेला.तर नवरीचे तिच्या प्रियकराशी लग्न होणार होते. मात्र, जो नवरदेव होता त्याची वरात रिकामीच मागे कशी पाठवायची असा प्रश्न निर्माण झाला. अखेर त्या गावातील एका कुटुंबाने आपल्या मुलीशी त्या नवरदेवाचे लग्न लावून दिले आणि सर्वच प्रश्न सोडवला गेला.