Typhoid Healthy Food : टायफाईडच्या तापात आवश्य खा ‘या’ 5 गोष्टी, वेगाने होईल रिकव्हरी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   टायफाईडचा जीवघेणा आजार साल्मोनेला टायफी नावाच्या बॅक्टेरियाच्या संसर्गाने होतो. या आजाराने शरीरात रक्ताची कमतरता होऊ लागते आणि आपली इम्युन सिस्टिम आणि लिव्हर व्यवस्थित काम करणे बंद करते. यामध्ये तापात व्यक्तीचे शरीर तापू लागते. अनेकदा डायरियासारख्या समस्यासुद्धा होतात. टायफाईडमध्ये डॉक्टर रुग्णांना खास डाएट फॉलो करण्याचा सल्ला देतात.

द्रवरूप पदार्थ

टायफाईडमध्ये तहान लागत नसल्याने रुग्णाला डिहायड्रेशन होते. डायरियासारखी समस्या होऊ शकते. या धोक्यापासून वाचण्यासाठी जास्त द्रवपदार्थ घ्या. रोज किमान 8 ग्लास पाणी प्या. नारळ पाणी या आजारात खूप लाभदायक मानले जाते.

कार्बोहायड्रेटच्या वस्तू

टायफाईडच्या तापात जास्त कार्बोहायड्रेटयुक्त वस्तू खाल्ल्यानेसुद्धा शरीराला फायदा होतो. मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवा की, तुम्ही जे सेवन कराल, ते पचवण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. उकडलेले बटाटे किंवा उकडलेले तांदूळ यामध्ये लाभदायक आहेत.

मनुका

टायफाईडच्या तापापासून दिलासा मिळण्यासाठी मनुका खूप चांगली वस्तू आहे. यास युनानी औषधाच्या रूपातसुद्धा पाहिले जाते. मुनकामध्ये सैंधव मीठ मिसळून किंवा ते तव्यावर भाजून खाल्ल्यास टायफाईडचा ताप कमी होतो. जास्त ताप आल्यास तुम्ही 4-5 मनुका भाजून खाऊ शकता.

डेअरी प्रॉडक्ट

टाइफाईडच्या तापात रुग्णाला खूप अशक्तपणा जाणवतो. अशावेळी शरीराला ताकदीची आवश्यकता असते आणि यासाठी डेअरी प्रॉडक्ट लाभदायक ठरतात. शरीराला एनर्जी देण्यासाठी तुम्ही योगर्टसारखे डेअरी प्रॉडक्टचे सेवन करू शकता.

हाय कॅलरी फूड

टायफाईडच्या तापात डॉक्टर रुग्णाला हाय कॅलरी फूड खाण्याचा सल्ला देतात. कारण या तापात व्यक्तीचे शरीर खूप कमजोर होते आणि हळूहळू वजनसुद्धा कमी होऊ लागते. अशावेळी कॅलरीवाल्या वस्तू शरीराला ताकद देण्याचे काम करतात. तुम्ही केळे, बीट आणि पीनट बटरसारख्या वस्तू खाऊ शकता.