‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ सिनेमाबाबत उदयनराजे भोसले म्हणतात…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ हा सिनेमा कालच(शुक्रवार दि 10 जानेवारी) सर्वत्र रिलीज झाला. हा सिनेमा शिवरायांचा वीर योद्धा तान्हाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर भाष्य करतो. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. सर्व स्तरातून सिनेमाचं कौतुक सुरू असताना आता छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज उदयनराजे भोसले यांनी या सिनेमाबाबत फेसबुकवर भाष्य केलं आहे. त्यांनीही सिनेमाचं भरभरून कौतुक केलं आहे.

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये उदयनराजे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू शूरवीर सहकारी सेनापती तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारीत तान्हाजी द अनसंग वॉरियर हा सिनेमात नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमात तान्हाजी मालुसरे यांची भूमिका अजय देवगण यांनी साकारली व छत्रपती शिवरायांचा ज्वलंत इतिहास देशासमोर सादर केला. याबद्दल प्रथम त्यांचे आभार.”

पुढे आपल्या पोस्टमध्ये उदयनराजे म्हणतात, “आज आपण जे स्वराज्य पाहतोय या स्वराज्यासाठी तान्हाजी मालुसरे यांच्यासह अनेक शूरवीर मावळ्यांनी शिवरायांना साथ दिली. अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. हा इतिहास आणि पराक्रम देशातील नवतरुणांच्या मनात बिंबवणे अत्यावश्यक झाले आहे. ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या सिनेमाची पूर्ण टीम तसेच अजय देवगण यांची प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी लक्ष लक्ष शुभेच्छा. यापुढेही ते आपल्या स्वराज्याचा इतिहास संपूर्ण जगाला दाखवत राहतील हीच अपेक्षा.” असेही ते म्हणाले आहेत.

तान्हाजी सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा वीर योद्धा आणि मावळा तान्हाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर आधारीत हा सिनेमा आहे. कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी त्यांनी कशी जीवाची बाजी लावली हा सगळा प्रवास आणि ते युद्ध सिनेमात पहायला मिळत आहे. बॉलिवूडमध्ये आजवर बनलेल्या अनेक ऐतिहासिक सिनेमात तांत्रिकदृष्ट्या हा सिनेमा उजवा ठरतो.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !