Uddhav Thackeray Birthday | जेवलात ना? उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसावरुन सभागृहात निलम गोऱ्हे अन् अनिल परब यांच्यात ‘तू तू मैं मे’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) प्रमुख उद्धव ठकारे यांचा आज वाढदिवस (Uddhav Thackeray Birthday) आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठाकरे गटाचे नेते, कार्यकर्ते विविध ठिकाणी वेगवेगळे उपक्रम रावबत आहेत. उद्धव ठाकरे यांना अनेक नेत्यांकडून वाढदिवसाच्या (Uddhav Thackeray Birthday) शुभेच्छा दिल्या जात आहेत. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे गटाच्या (Eknath Shinde Group) नेत्यांनी देखील उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. असं असताना आज विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे (Speaker Neelam Gorhe) आणि ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (MLA Anil Parab) यांच्यात उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसावरुन चांगलीच जुंपली.

सभागृहात नेमकं काय झालं?

सध्या अधिवेशन (Monsoon Session) सुरु असून आज विधान परिषदेत चर्चा सुरु होती. त्यावेळी ठाकरे गटाचे आमदर अनिल परब म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस (Uddhav Thackeray Birthday) असल्याने आम्हाला लवकर जायचे आहे. याबाबत आम्ही विनंती केली होती. यावर प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी आक्षेप घेत म्हणाले, असं कसं चालेल तुम्हाला जायचे असेल तर जावा.

प्रविण दरेकर यांच्या भूमिकेवर अनिल परब यांनी इशारा दिला. ते म्हणाले, सत्ताधारी पक्षाची जर भूमिका असेल तर मग आमच्याकडून कोणत्याही सहकार्याची अपेक्षा करु नका. याच दरम्यान सत्ताधारी पक्षातील आमदार खाली बसूनच बोलले की, नको आम्हाला तुमचे सहकार्य. यावर अनिल परब यांनी वक्तव्य केलं. मग आम्हाला बिलांवर बोलायचे आहे आणि जर मंजूर नाही तर जबाबदारी आमची नाही, असं उत्तर परब यांनी सत्ताधाऱ्यांना दिलं.

त्यावर सभापती निलम गोऱ्हे यांनी भूमिका मांडली. मंत्री सावे यांचे बील महत्वाचे आहे.
याच्याबद्दल अहंकाराचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न कुणी करू नये. ज्यांना जायचे असेल त्यांनी जावे. उशीरा गेलात तरी चालेला ना? आम्हालाही माहितीये काही असा प्रश्न नाहीये. त्यांच्यावर जाहीर चर्चा करू नका. यावर अनिल परब म्हणाले, आमची विनंती मान्य करता येणार नाही असं स्पष्ट करा मग.

अनिल परब यांच्या विधानावर निलम गोऱ्हे म्हणाल्या,
अनिल परब जेवलात ना? वाढदिवसाच्या दिवशी असं वागणं बरं दिसतं का?
वाढदिवसाकरता जाणे गरजेचे आहे.
पण ज्या करता तुम्ही या सभागृहात आलात तेही तुम्ही विसरू नका.
36 नंबरचे विधेयक होते ते, आता इथे 36 चा आकडा होता होता राहिला,
असा टोला गोऱ्हे यांनी लगावला.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

Web Title : 

Pune Metro News | पुणे मेट्रोने प्रवास करणार्‍या विद्यार्थ्यांना एक ऑगस्टपासून तिकीट
दरात 30 टक्के सवलत; अन्य प्रवाशांना शनिवार आणि रविवारी मिळणार या सवलतीचा लाभ