Uddhav Thackeray on Devendra Fadnavis | ‘चाणाक्य अन् त्यांची कूटनीती…’, देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Uddhav Thackeray on Devendra Fadnavis | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबतची युती (Alliance) का तुटली याबाबत काल मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2019 साली उद्धव ठाकरे यांनी आपल्या पाठीत खंजीरच खुपसला. बेईमानी शिवाय याला दुसरं काही म्हणता येणार नाही. त्यांनी माझ्या नाहीतर भाजपच्या (BJP) पाठीत खंजीर खुपला, बेईमानी होते, तेव्हा कूटनीती वापरावी लागते. महाभारतातही हेच घडले, असे भिवंडीतील महाविजय 2024 पदाधिकारी मेळाव्यात (BJP Mahavijay Workshop) बोलताना फडणवीस म्हणाले होते. याला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Uddhav Thackeray on Devendra Fadnavis)

 

देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाचे (Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, जनतेच्या खलबत्त्यात चाणक्य (Chanakya) आणि त्यांची कूटनीती कुटून बारीक करायची आहे, असे टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर सोडलं. मातोश्री निवासस्थानाबाहेर उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.

 

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, अर्धे उपमुख्यमंत्री बोलले राष्ट्रवादीबरोबर (NCP) युती ही कूटनीती आहे. ही कूटनीती आपल्याला कुटून टाकायची आहे. जनतेचा खलबत्ता किती मोठा आहे, हे त्यांना कळलं नाही. चाणक्य खलबतं करतो. तर, जनतेचा खलबत्ता असतो. त्या खलबत्त्यात चाणक्य आणि त्यांची कूटनीती कुटून बारीक करायची आहे, अशा शब्दात त्यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला.

 

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस यांनी कर्णाचे उदाहरण देताना म्हणाले होते,
कर्णाची कवचकुंडले (Karna Kavachkundale) काढून घेतल्याशिवाय कर्णावर विजय मिळविता येणार नाही,
हे कृष्णाला (Shri Krishna) माहिती होते.
भीष्माला (Bhishma) पराभूत करण्यासाठी शिखंडीला उतरविले. सुर्यास्त भासविला,
द्रोणाचार्यांना (Dronacharya) जेव्हा अश्वत्थामा (Ashwatthama) गेला असे सांगायचे होते,
तेव्हा नरोवा कुंजरोवा (Narova Kunjarova) हे सांगताना एवढ्या जोरात शंख वाजवला
की त्यांना फक्त अश्वत्थामा गेला एवढेच ऐकायला गेले. हा अधर्म नाहीय ही कुटनीती आहे. जेव्हा जेव्हा बेईमानी होईल तेव्हा तेव्हा कुटनीती वापरावीच लागेल.

 

 

Web Title : Uddhav Thackeray on Devendra Fadnavis | uddhav thackeray reply devendra fadnavis over kutniti statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा