Uddhav Thackeray Slams Eknath Shinde | रावणाला शिवधनुष्य पेललं नाही, या मिंध्याला पेलणार का? उद्धव ठाकरेंचा मोदी-शहांसह शिंदेंवर घाणाघात

यवतमाळ : Uddhav Thackeray Slams Eknath Shinde | ज्या बाळासाहेब ठाकरेंनी मोदींना वाचवले त्यांचीच शिवसेना मोदींनी फोडली. यांनी प्रभू रामचंद्रांचा धनुष्यबाण कलुषित करुन टाकला. आता चोराच्या हातात धनुष्यबाण आहे. रावणाला शिवधनुष्य पेलले नाही ते या मिंध्याला पेलणार का? त्यांना त्यांच्या ४० जणांच्या दाढीचे वजन पेलत नाही, जागावाटप करताना आत्ताच उताणे झालेत, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला. ते यवतमाळच्या सभेत बोलत होते.(Uddhav Thackeray Slams Eknath Shinde)

उद्धव ठाकरे म्हणाले, आत्ता जे लोक माझ्यासमोर बसले आहेत ते माझे शिवधनुष्य आहे. पुन्हा मोदी सरकारला दिल्लीत येऊ द्यायचे नाही ही शपथ घ्या. निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना अडवले जात आहे. आता आम्ही मोदींना दिल्लीत जाऊ देणार नाही ही शपथ घ्या.

उद्धव ठाकरे म्हणाले, आमच्याकडे मोदी येतात, मते मागतात, त्या बदल्यात थापा मारता.
२०१४ ला आम्हीच आलो होतो मोदी मोदी करत. २०१९ लाही तेच केले.
पण शेतकऱ्यांच्या पाठीत जसा मोदींनी वार केला तसाच वार त्यांनी शिवसेनेवर केला.
बाळासाहेब ठाकरेंनी मोदींना पाठिंबा दिला होता. त्यांच्या शिवसेनेला हे संपवायला निघाले. नाव चोरले, पक्ष चोरला.
शिवसेना हे नाव मोदींनी दिलेले नाही आणि धोंड्याने म्हणजेच निवडणूक आयोगानेही दिलेले नाही.
ते माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी दिलेले नाव आहे.

संजय राठोड, भावना गवळी आणि शिंदे गटाच्या इतर नेत्यांवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, बंजारा समाजाचा
भूखंड गद्दाराच्या खिशात घातला आहे. हे मी सांगत नाही हे छापून आले आहे. राखी बांधणाऱ्या बहिणीचा भ्रष्टाचार
मोदींनी झाकून टाकला. मिंध्यांबरोबर जे पळाले त्यांच्यावरही ईडीच्या धाडी पडल्या होत्या. ते सगळे गद्दार तिकडेच आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap | पुणे : लाच मागणाऱ्या थेऊरच्या महिला मंडल अधिकाऱ्यासह तीन जण अ‍ॅन्टीकरप्शनच्या जाळ्यात

Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : तडीपार गुन्हेगाराला साथीदारांसह अटक, पिस्टल, काडतुस जप्त; घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस (Video)

Merged Villages In PMC | पुणे महानगरपालिकेत नव्याने सामाविष्ट 34 गावांचा वाढीव तीनपट ते दहापट मिळकतकर कमी करण्याची कार्यवाही तात्काळ करा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मंत्रालयात आयोजित बैठकीत निर्देश

Congress leader Padmakar Valvi joins BJP | काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश ! काँग्रेसला अनेक मोठे धक्के बसणार; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे