‘जे जे करणे शक्य असेल ते माझ्या नागपुरात करेन’, असे का बोलले मुख्यमंत्री ठाकरे, जाणून घ्या

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – आम्हाला विदर्भावर प्रेम नाही असे म्हणणे चुकीचे आहे. गेल्या वीस ते पंचवीस दिवसातील माझा हा विदर्भातील तिसरा दौरा आहे. पहिल्यांदा गोसेखुर्दच्या पाहण्यासाठी आलो होतो. त्याच्या दोन दिवसांनी भंडाऱ्यात पुन्हा आलो. आज पुन्हा आलो आहे. उगाच अफवा पसरवली जाते. माझे आजोळ अमरावती जिल्ह्यातील परतवाड्या तालुक्यातील आहे. आमच्यात विदर्भाच रक्त आहे असे म्हणत जे जे करणे शक्य असेल ते माझ्या नागपुरात करेन असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या उद्‍घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सुनील केदार, संजच राठोड, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास, महापौर दयाशंकर तिवारी, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशीष जैस्वाल, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलिस आयुक्त अमितेश कुमार उपस्थित होते.

आज‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या उद्घाटनासाठी आलो आहे. महिनाभपापूर्वी अमरावती बाळासाहेब ठाकरे महामार्गाची पाहणी करण्यासाठी आलो होतो, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. दरम्यान नागरिकांना आता पर्यावरणाचे महत्व समजू लागले आहे. याचा आनंद आहे. 1 मे रोजी नागपूर ते शीर्डी समृद्धी मार्गाचे उद्घाटन करण्याचे ठरवले आहे, ते होईल, असेही ते म्हणाले. नागपूर आणि विदर्भात पर्यटक कसे आणायचे याची जबाबदारी सर्वांना घ्यायची आहे. वनराजधानीची सुरुवात नागपूरपासून होईल, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.