UGC ने UG आणि PG साठी सूरू केले 100 ऑनलाईन अभ्यासक्रम, SWAYAM प्लॅटफॉर्मवर होणार उपलब्ध !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यूनिवर्सिटी ग्रांट्स कमीशनने 100 हून अधिक ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. हे अभ्यासक्रम यूजी आणि पीजी या दोन्ही वर्गांसाठी आहेत. जानेवारी 2021 चे हे अभ्यासक्रम ‘SWAYAM’ प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठे किंवा संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेले आहेत त्यांना या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करता येईल. अभ्यासक्रमांची यादी पाहण्यासाठी यूजीसीच्या ugc.ac.in. या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता,

यूजीसीने ट्विटच्या माध्यमातून जानेवारी 2021 साठी 78 यूजी आणि 46 पीजी नॉन-अभियांत्रिकी एमओसी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असल्याचे घोषित केले. विद्यार्थी त्यांच्या गरजेनुसार आणि सोयीनुसार त्यामध्ये सामील होऊ शकतात.

या अभ्यासक्रमांच्या संभाव्य परीक्षेच्या तारखा 08 आणि 09 मे 2021 रोजी निश्चित केल्या आहेत, ज्यामध्ये फेरबदल शक्य आहे. ही परीक्षा राष्ट्रीय चाचणी संस्था घेईल. कोणत्याही विद्यापीठ किंवा महाविद्यालयातील विद्यार्थी कोर्समधून क्रेडिट ट्रान्सफर लाभ घेऊ शकतात. हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी तसेच कार्यरत व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरतील.

या अभ्यासक्रमांबद्दल खास गोष्ट अशी आहे की कोणीही त्यांच्यात सामील होऊ शकेल. मग ते शैक्षणिक क्षेत्रात असो की इतर कोणत्याही क्षेत्रात. विद्यार्थ्यांव्यतिरिक्त, ते वर्कींग, व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक आणि होम मेकर्सही यात सामील होऊ शकतात. या अभ्यासक्रमांविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी आपण यूजीसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.