Ujani Dam Backwater Boat Accident | उजनी बोट दुर्घटनेत करमाळा आदिनाथ कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरेंचा मुलगा बुडाला, बेपत्ता असलेल्यांची नावे समजली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Ujani Dam Backwater Boat Accident | उजनी धरणाच्या जलाशयात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यामुळे प्रवासी बोट बुडाली. यामध्ये सहा जण बेपत्ता आहेत. बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्याचे काम एनडीआरएफचे (NDRF) पथक स्थानिकांच्या मदतीने करत आहे. दरम्यान, या दुर्घटनेत करमाळा आदिनाथ कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे यांचा मुलगा गौरव डोंगरे देखील बुडाल्याची माहिती समोर आली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे. बेपत्ता प्रवाशांमध्ये चौघेजण एकाच कुटुंबातील आहेत .(Ujani Dam Backwater Boat Accident)

प्रवाशांना घेऊन निघालेली ही बोट बुडाल्यानंतर एकच हलकल्लोळ उडाला. एक व्यक्ती पोहत काठावर आल्याने दुर्घटना
घडल्याचे समजले. १७ तासांच्या शोधकार्यानंतर ही बोट ३५ फूट खोल पाण्यात सापडली. मात्र अद्याप ६ प्रवाशी बेपत्ता आहे.

बुडालेल्या प्रवाशांची नावे –
गोकुळ दत्तात्रय जाधव (वय ३०), कोमल दत्तात्रय जाधव (वय २५) शुभम गोकुळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकुळ जाधव
(वय ३) (सर्व रा.झरे ता.करमाळा), अनुराग अवघडे (वय ३५) गौरव धनंजय डोंगरे (वय १६ दोघे रा.कुगाव ता.करमाळा)
अशी बुडालेल्या सहा प्रवाशांची नावे आहेत.

दुर्घटनाग्रस्त बोट इंदापूर तालुक्यातील कळाशी येथून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगावकडे येताना
वादळी वाऱ्याने ही घटना घडली. बोट दुर्घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे, खासदार रणजितसिंह निंबाळकर घटनास्थळी
पोहचले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे कार अपघातानंतर कोर्टात आजोबांनी दिली होती गॅरंटी, माझा नातू अभ्यासात लक्ष देईल, वाईट संगतीपासून दूर राहील

PMC Notice To Bajaj Allianz House | अनधिकृत बांधकाम प्रकरणी बजाज अलियान्झ हाऊसला पुणे महापालिकेची नोटीस

Indapur Bhima River | इंदापुरात भीमा नदीत बोट बुडाली, 6 जण बेपत्ता, 17 तासांनंतर बोट सापडली, पोलीस उपनिरीक्षक डोंगरे बचावले, एनडीआरएफचे शोधकार्य सुरू