Ulhas Bapat On NCP MLA Disqulification | राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर उल्हास बापटांचे रोखठोक मत, ”चार-पाच पक्ष बदललेल्या अध्यक्षांकडून…”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Ulhas Bapat On NCP MLA Disqulification | आपली संसदीय लोकशाही ब्रिटनवरून घेतली आहे. तिथे सभागृहाचा अध्यक्ष पंचाप्रमाणे काम करतो. मात्र अध्यक्षपदी निवडल्यानंतर तो पक्षाचा राजीनामा देतो. आपल्याकडील अध्यक्ष कुठल्यातरी पक्षाचा सदस्य असतो, त्यामुळे त्याच्याकडून न्यायाची अपेक्षा करणे चुकीचे आहे. त्यात जर चार-पाच पक्ष बदललेला अध्यक्ष असेल तर न्यायाची अपेक्षा ठेवणे आणखी चुकीचे आहे, असे रोखठोक मत घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी मांडले आहे. (Ulhas Bapat On NCP MLA Disqulification)

येत्या काही तासात म्हणजेच दुपारी ४.३० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देणार आहेत. मात्र, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाप्रमाणेच हा याप्रकरणाचा निकाल लागणार हे जवळपास स्पष्ट आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष नाव आणि घड्याळ हे चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे. यामुळे आमदार अपात्रता प्रकरणी या निर्णयाच्या आधारे सर्व याचिका फेटाळल्या जाण्याची चिन्हे आहेत. आजच्या निकालाबाबत उल्हास बापट यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना हे मत व्यक्त केले.

उल्हास बापट म्हणाले, पक्ष कोणाचा आहे, हे ठरविण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, हे आता आपल्या सर्वांनाच
कळले आहे. पण निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची नेमणूक पंतप्रधान करतात. ६५ वर्षांनंतर त्यांना योग्य कामाची बक्षिसी
देण्याचे कामही पंतप्रधान करतात, त्यामुळे मी त्यांच्याकडून फार न्यायाची अपेक्षा करत नाही.

उल्हास बापट म्हणाले, आता प्रश्न राहिला राज्यपालांचा, तर त्यांचीही निवड पंतप्रधानांच्या सूचनेवर राष्ट्रपती करत असतात.
ज्या पदावरील लोकांनी तटस्थपणे पंचाची भूमिका पार पाडणे आवश्यक आहे, त्यांची विश्वासार्हता घसरताना गेल्या
काही काळापासून दिसत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Rural Police | चोरी करुन वृद्ध महिलेचा खून करणाऱ्या दाम्पत्याला अटक, पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

‘चेन्नई एक्सप्रेस’मध्ये चोरी करणाऱ्याला लोहमार्ग पोलिसांकडून अटक, नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त

गांजाची तस्करी करणाऱ्या सिव्हील इंजिनिअरसह तिघांना गुन्हे शाखेकडून अटक, 27 किलो गांजा जप्त

पुणे : उसने दिलेले पैसे परत मागितल्याने महिलेला अश्लील मेसेज करुन धमकी, दोघांवर विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल