काय सांगता ! होय, फक्त 17 मिनीटांमध्ये लग्न उरकलं, वरानं हुंडयात मागितली ‘ही’ गोष्ट

शाहजहांपुर : वृत्तसंस्था –  युपीच्या शाहजहांपुरमध्ये 17 मिनिटात झालेला आगळा-वेगळा विवाह आश्चर्य वाटण्यासारखाच आहे. शिवाय, वराने हुंड्यात काय मागितले, हे सुद्धा हैराण करणारेच आहे. हा विवाह पाटणाच्या कली देव मंदिरात झाला ज्यामध्ये वाजंत्री नव्हते, घोडा आणि वरात नव्हती. घरातील काही सदस्यांच्या उपस्थितीत वधु-वराने मंदिराला सात प्रदक्षिणा घातल्या आणि लग्न झाले. या विवाहाचा उद्देश केवळ हुंडा प्रथेचे उच्चाटन करण्याचा होता, हा विवाह संपूर्ण भागात चर्चेचा विषय ठरला आहे.

कलानच्या सनाय गावात राहणारे पुष्पेंद्र दुबे हे गावात शिक्षण संस्था चालवतात, त्यांचा विवाह हरदोईच्या प्रीती तिवारीसोबत ठरला होता. पुष्पेंद्र यांनी लग्न आणि वरातीच्या झगमगाटला अगोदर पासूनच विरोध दर्शवला होता. कोरोना कर्फ्यूदरम्यान गुरुवारी ठरलेल्या मुहूर्तावर काही नातेवाईकांसोबत पाटणा देव कली येथील शिव मंदिरात विवाहाचे सर्व विधी पूर्ण करण्यात आले.

वधु-वराने मंदिराला सात प्रदक्षिणा घातल्या आणि अवघ्या 17 मिनिटात विवाह पार पडला. या वेगळ्या विवाहाचे आणखी वैशिष्ट्य हे होते की, वराने हुंडा म्हणून केवळ एक रामायण घेतले, ते सुद्धा सासरच्यांनी खुपच आग्रह केल्यानंतर.

पुष्पेंद्र आणि प्रीती यांचे म्हणणे आहे की, इतर तरूणांनी सुद्धा अशाच प्रकारे विवाह करून अनावश्यक खर्च आणि हुंडा टाळावा. सध्या त्यांच्या या पावलाचे सर्व कौतूक होत आहे.