नवीन ‘लुक’वाल्या एन-95 मास्कची वैशिष्ट्येजाणून तुम्ही सुद्धा व्हाल चकीत, शिरकाव करू शकणार नाही व्हायरस

वॉशिंग्टन : पोलीसनामा ऑनलाइन  –  कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी मास्क घालणे अनेक देशात अनिवार्य केले आहे. यासाठी उपयुक्त मानला जाणार्‍या एन-95 मास्कची उपलब्धता आणि किंमत एक समस्याच आहे, परंतु ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसद्वारे प्रकाशित ऑक्सफर्ड ओपन मटेरियल सायन्सच्या एका नव्या शोधपत्रात यावर उपाय सांगितला आहे. यात म्हटले आहे की, सध्याच्या एन-95 मास्कमध्ये सुधारणा करून त्यास संसर्गमुक्त करून मोठ्या कालावधीपर्यत वारंवार वापरात आणता येईल.

जाणून घ्या नव्या मास्कची वैशिष्ट्ये

प्राथमिक स्तरावर मास्कची गुणवत्ता त्याच्या फिल्टरची क्षमता एयरोसोलचा आकार आणि वापराचा कालावधी यावर ठरवली जाते. पारंपरिक एन-95 मास्कमध्ये स्तर प्रणाली (लेयर सिस्टम) आणि त्याची इफिशियन्सी कार्यक्षमता 95 टक्के असते. हा मास्क आठ तासांपेक्षा जास्त वापरल्यानंतर त्याचा परिणाम कमी होऊ लागतो. असे यामुळे होते कारण तो एकवेळ वापरासाठी डिझाईन करण्यात आलेला असतो, परंतु कोरोना महामारी काळात मागणी वाढण्याने मास्क संसर्गमुक्त करून पुन्हा वापरण्याची आवश्यकता भासू लागली.

याची किंमत 200-250 रुपये होती. यामुळे शास्त्रज्ञ अशा प्रकारच्या मास्कला संसर्गमुक्त करून पुन्हा वापरात आणण्यासाठी उपाय शोधत होते. आता संशोधकांनी कमी किंमतीचा एक मास्क डिझाईन केला आहे. हा एक डॉलर (सुमारे 73 रुपये) मध्ये नायलॉनयुक्त तीन थरांचा मास्क आहे, ज्यामध्ये परावर्तीत पॉलीप्रोपलीन तसेच न विनलेला कॉटन असेल. एन-95 मास्कमध्ये पॉलीप्रोपलीनचा लेयर अगोदर सुद्धा होता, परंतु या नव्या डिझाईनमध्ये ग्रॅफीन ऑक्साईड आणि पॉलीविनायलिडीन फ्लोराईडचे मिश्रणसुद्धा लावले जाईल, जे एक सक्रिय फिल्टर लेयरचे काम करेल.

अलिकडच्या एका अभ्यासातून हे समोर आले आहे की, ग्रॅफीन ऑक्साईड मिश्रण उच्च गुणवत्तापूर्ण बॅक्टेरिया रोधक काम करते, जे मास्कला परिणामकारक बनवते. हे कोटिंग मास्क हेवी वॉटरने धुवून संसर्गमुक्त बनवल्यानंतर सुद्धा काम करते. अशाप्रकारे हा मास्क दुसर्‍यावेळी वापरताना सुद्धा 95 टक्केची इफिशियन्सीचा असेल. कमी किंमत, घालण्यास सोपा आणि पुन्हा वापरण्याजोगा हा मास्क सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात खुप उपयोगी ठरेल.