नव्या CBI प्रमुखांच्या रेसमध्ये शॉर्टलिस्ट झाले ‘हे’ 3 अधिकारी, लवकरच नावावर होणार शिक्कामोर्तब – सूत्र

नवी दिल्ली : सेंट्रल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) च्या डायरेक्टर पदाच्या नियुक्तीबाबत पंतप्रधान निवासस्थानी सोमवारी बैठक झाली. सूत्रांनुसार, बैठकीत जी तीन नावे शॉर्टलिस्ट झाली आहेत, यापैकीच एकावर शिक्कामोर्तब होऊ शकते. शॉर्टलिस्ट झालेले तीन अधिकारी उत्तर प्रदेश, बिहार आणि आंध्र प्रदेश केडरचे आहेत. यापैकी एकाला फेब्रुवारीपासून रिक्त असलेल्या सीबीआय डायरेक्टर पदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. या तीन अधिकार्‍यांबाबत जाणून घेवूयात…

कुमार राजेश चंद्रा, एसएसबी, डीजी
कुमार राजेश चंद्रा 1985 बॅचचे बिहार केडरचे आयपीएस आहेत. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात पीजी केले आहे. ते पाटणा सिटीचे एएसपी होते. औरंगाबाद, सीवान, गोपाळगंज, बेगूसराय, मुजफ्फरपुर, बोकारो, चतरा, धनबादमध्ये पोलीस प्रमुख म्हणून त्यांनी काम केले आहे. भागलपुरच्या पूर्व रेंजचे पोलीस उप महानिरीक्षक होते. बिहारच्या स्पेशल ब्रँचचे एसपी म्हणून त्यांनी काम केले आहे. राज्यपालांचे एडीसी सुद्धा होते. केंद्रीय प्रतिनियुक्तीवर गेल्यानंतर ते पंतप्रधानांच्या सुरक्षेतील एसपीजीचे डीआयजी आणि आयजी सुद्धा होते. त्यांनी नागरी उड्डयन सुरक्षा ब्यूरोचे महासंचालक म्हणून काम केले आहे आणि सध्या सशस्त्र सीमा दलाचे महासंचालक आहेत. त्यांनी पोलीस पदक, राष्ट्रपती पोलीस पदक, विशेष कर्तव्य पदक आणि अंतर्गत सुरक्षा पदक मिळाले आहे.

वायएसके कौमुदी, विशेष सचिव, गृह मंत्रालय
सिनियर आयपीएस वायएसके कौमुदी आंध्र प्रदेश केडरच्या 1986 बॅचचे आयपीएस ऑफिसर आहेत. यावेळी ते गृह मंत्रालयात स्पेशल सेक्रेटरी म्हणून तैनात आहेत. कौमुदी यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत आहे. त्यांनी ब्यूरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट (बीपीआरडी) चे डीजी म्हणून काम केले आहे.

हितेश चंद्र अवस्थी, युपी डीजीपी
सिनियर आयपीएस हितेश चंद्र अवस्थी सध्या उत्तर प्रदेशचे डीजीपीचा कार्यभार सांभाळत आहेत. ते 2005 ते 2008 पर्यंत नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरो (एनसीआरबी) मध्ये डीआयजी आणि डेप्युटी डायरेक्टर होते. 2008 ते 2013 पर्यंत सीबीआईमध्ये आयजी आणि जॉईंट डायरेक्टर पदावर होते. दोन वेळा ते राज्याच्या गृह विभागात सचिव सुद्धा होते. अविभाजित उत्तर प्रदेशमध्ये टिहरी गढवाल आणि हरिद्वारचे एसपी होते. 2016 मध्ये एडीजी ते डीजी पदावर प्रमोट झाले आणि डीजीपी मुख्यालय, टेलीकॉम, होमगार्ड्स, अँटी करप्शन आर्गनायझेशन (एसीओ), आर्थिक गुन्हे आणि संशोधन शाखा (ईओडब्ल्यू) मध्ये डीजी पदावर होते. 2017 पासून यूपी डीजीपी बनण्यापर्यंत ते डीजी व्हिजिलन्स पदावर कार्यरत होते.