आंतरधर्मीय विवाहाच्या प्रकरणात मुस्लिम तरूण-त्याचा भाऊ अटकेत, बजरंग दलाचे कार्यकर्ते हिंदू महिलेला म्हणाले…

मुरादाबाद : उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये पोलिसांनी धर्म-परिवर्तनाशी संबंधित लागू केलेल्या नव्या कायद्यांतर्गत एका मुसलमान तरूणाला आणि त्याच्या भावाला अटक केली आहे. तरूण हिंदू तरूणीसोबत केलेला विवाह रजिस्ट्रार कार्यालयात नोंदणी करण्यासाठी गेला होता. एक व्हिडिओ समोर आला आहे, त्यामध्ये कथित प्रकारे बजरंग दलाचे कार्यकर्ते जोडप्याला विचारत आहे की, तरूणीने धर्म परिवर्तनाच्या आपल्या इच्छेबाबत स्थानिक जिल्हाधिकार्‍यांना माहिती दिली आहे का? जे नव्या कायद्यानुसार आवश्यक आहे. सोशल मीडियावर वायरल झालेल्या व्हिडिओत अनेक लोकांनी मुरादाबादच्या कांठ पोलीस ठाण्याच्या परिसराच्या आत महिलेला घेरल्याचे दिसत आहे.

व्हिडिओत ते जेकाही बोलले जात आहे ते ऐकू येत आहे, ‘आम्हाला धर्म परिवर्तन करण्यासाठी कलेक्टरची परवानगी दाखवा. दोन पोलिस कॉन्स्टेबल उपस्थितीत असताना एक व्यक्ती ज्याच्यासोबतच्या व्यक्तीच्या हातात काठी आहे तो तरूणीला म्हणत आहे की, तुम्ही नवीन कायदा वाचला आहे की नाही? तिकडे, आणखी एकाने म्हटले, हा कायदा तुमच्यासारख्याच लोकांसाठी बनवला आहे.

कांठ पोलीस ठाण्याचे एसएचओ अजय गौतम यांनी म्हटले की, तरूणीच्या कुटुंबियांच्या तक्रारीच्या आधारावर शुक्रवारी दोघांना अटक करण्यात आली आहे. तरूणीने सांगितले की, ती सज्ञान आहे आणि आपल्या इच्छेने तिने काही महिन्यांपूर्वी तरूणाशी विवाह केला होता. मात्र, तत्काळ हे स्पष्ट झाले नाही की, तिने आपले धर्म परिवर्तन केले आहे किंवा नाही.

माहितीनुसार, मुरादाबादचा तरूण राशिदची तरूणीसोबत देहरादूनमध्ये ओळख झाली होती, जी बिजनौरची आहे. तरूणी देहरादूनमध्ये शिक्षण घेत होती, तर राशिद काम करतो. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी माहिती दिल्यानंतर पोलीस रजिस्ट्रार कार्यालयात पोहचले होते. दोन्ही तरूणांना अटक करून मॅजिस्ट्रेट समोर सादर करण्यात आले, जिथे दोघांना जेलमध्ये पाठवण्यात आले.

उत्तर प्रदेश सरकारने 24 नोव्हेंबरला विवाहासाठी जबरदस्तीने किंवा खोटे बोलून धर्म परिवर्तन करण्याच्या प्रकारणांसाठी कायद्याविरुद्ध धर्म परिवर्तन प्रतिबंधित अध्यादेश-2020 मंजूर केला होता. या अंतर्गत दोषी व्यक्तीला 10 वर्षांचा करावास होऊ शकतो. राज्याच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी 28 नोव्हेंबरला या अध्यादेशला मंजूरी दिली होती.