यशोगाथा ! ‘या’ पध्दतीनं तयारी करून ”गल्‍ली बॉय’ बनला IAS, मिळवली 77 वी रँक, जाणून घ्या

जोधपूर : वृत्तसंस्था –  एके काळी जोधपूर मधील गल्ली-बोळांमध्ये क्रिकेट खेळणारा तसेच अभ्यासात साधारण असणारा एक मुलगा ज्याला कोणी विचारले की, मोठेपणी तू काय होणार..? तर मला मोठं व्हायचं नाही असं उत्तर देणारा मुलगा आज IAS बनला आहे. दिलीप प्रताप सिंह शेखावत यांनी संघ लोकसेवा आयोगाची ( UPSC ) परीक्षा ७७ व्या रँकने उत्तीर्ण केली आहे. ती ही केवळ आपल्या तिसऱ्या प्रयत्नात. हा मुलगा जेव्हा पहिल्या दोन परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण झाला तेव्हा लोकांनी त्याला म्हटले की, हे आयएएस होणे वगैरे तुझ्याच्याने होणार नाही. परंतु दिलीप यांनी आपले प्रयत्न सुरुच ठेवले. अखेर २०१८ मध्ये त्याला या परीक्षेत यश मिळाले.

ऐसे तैयारी करके गली ब्वॉय से IAS बन गया ये लड़का, पाई 77वीं रैंक
जाणून घेऊयात नेमकं कशा प्रकारे तयारी करून दिलीप सिंह शेखावत यांनी देशातील अतिशय मानाची आणि अवघड समजली जाणारी यूपीएससी ची परीक्षा तिसऱ्या प्रयत्नात पास केली.
एका मुलाखतीत शेखावत यांनी सांगितले की मी एक गल्ली बॉय ते IAS झालो. मोठेपणी काय होणार असा प्रश्न विचारल्यावर लहानपनच मला जास्त आवडते. परंतु १२ वी नंतर काय करावे असा प्रश्न निर्माण झाला. मग एका अभियांत्रिकी महाविद्यालयात केमिकल इंजिनिअरिंग ला प्रवेश घेतला. NIT रुरकीला असताना एक वेळ अशी आली की सर्व सोडून घरी जावे
असे सुद्धा वाटले. पण तेथून वापस न येत शेवटच्या वर्षी कॅम्पस प्लेसमेंट मधून नौकरी भेटली.

ऐसे तैयारी करके गली ब्वॉय से IAS बन गया ये लड़का, पाई 77वीं रैंक

घरच्यांकडून परवानगी मिळवणे होते अवघड 
नौकरी करताना काही वरिष्ठांकडून असे समजले की IAS एक अशी नौकरी आहे जिथे समाज सेवेसोबत एक चांगली नौकरी करू शकतो. आपली एकंदरीत परिस्थितीत पाहता आपण हे करू शकू असं वाटलं नाही. त्यावर मी शिक्षणात साधारण होतो. महाविद्यालयात असताना काही विषयांमध्ये नापास सुद्धा झालो होतो. अशा परिस्थितीत सर्वात महत्वाचे होते ते म्हणजे या परीक्षेची तयारी करण्यासाठी घरच्यांकडून परवानगी मिळवणे हे होय.

ऐसे तैयारी करके गली ब्वॉय से IAS बन गया ये लड़का, पाई 77वीं रैंक
घरच्या मंडळींनी दिली मनोभावे साथ 
घरच्या व्यक्तींना आपल्या या निर्णयाबद्दल सांगितले तेव्हा ते म्हणाले की तुला जे करायचं आहे ते तू करू शकतो. आम्ही सर्व सांभाळून घेवूत. त्यावेळेस मी निश्चित केले की आयुष्य एकदाच मिळतं. जोखीम स्वीकारण्याची तर ती आत्ताच घावी लागेल. पुन्हा अशी संधी नाही मिळणार. मग काय सामान बांधले आणि आणि निघालो दिल्लीला. इथे दिल्ली मध्ये येऊन पहिले की इथे तर लाखोंच्या प्रमाणावर मुलं आहेत. जे अभ्यासाचे मटेरियल खरेदी करत आहेत.

ऐसे तैयारी करके गली ब्वॉय से IAS बन गया ये लड़का, पाई 77वीं रैंक

स्वतःची क्षमता ओळखण्यात कमी पडलो 
हा माझ्यासाठी एक वेगळाच अनुभव होता. इथे येऊन मी थोडं नैराश्यात गेलो. त्याचं कारण म्हणजे इथे चांगल्या चांगल्या घरातून आलेली मुले दिसली. अतिशय शिकलेली मुले पाहिली.
जर ही मुलं परीक्षा पास करू शकत नसतील तर मी कसं काय पास करू शकेन. मग विचार केला की इथून परत गेलो तर आपला चेहरा आरश्यात पाहू शकणार नाही.
नेहमी असे वाटत राहील की आपण काही करू शकलो नाहीत. इकडे आलो आहे तर तर एक वेळेस प्रयत्न करूनच पाहुयात.

ऐसे तैयारी करके गली ब्वॉय से IAS बन गया ये लड़का, पाई 77वीं रैंक

तुझ्याकडून होणार नाही 
शेखावत पुढे म्हणतात की इथे मला एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे मेहनत करणे आपल्या हातात आहे बाकी ईश्वरावर सोडूयात. अशा प्रकारे तयारी करून परीक्षा दिली आणि पूर्व परीक्षेतच नापास झालो. पराभवाच्या धक्क्याने मी आतून तुटलो होतो. पूर्व परीक्षेत नापास होणे खूप मोठा सेट बॅक असतो. आजूबाजूच्या लोकांनी तेव्हा हे तुझ्याच्याने होणार नाही असेही सांगिलते. परंतु मी हिम्मत ठेवून आपली वेळ येईल यावर विश्वास ठेवला. त्यामध्ये मला माझ्या घरच्यांकडून खूप मदत भेटली.
  स्वतःच्या क्षमतांवर अविश्वास 
जेव्हा दुसरे अटेम्प्ट द्यायची वेळ आली तेव्हा मी पहिल्या वेळेस केलेल्या चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेतली. या वेळेस मुलाखती पर्यंत पोचलो. परंतु , मुलाखतीबाबत एवढी हवा असते की विचारूच नका. सर्वजण के घाबरवण्याचा प्रयत्न करतात. हे विचारले जाईल ते विचारले जाईल. काही वैयक्तिक प्रश्न सुद्धा विचारले जातील. हे ऐकून मी नाराज झालो होतो.

आत्मविश्वासापेक्षा नाराजच जास्त होतो. परंतु मला यूपीएससी मध्ये कशातरी प्रकरे निवडले जावे वाटत असे. शेवटी ज्याची भीती होती तेच झाले आणि मी मुलाखतीत नापास झालो. यामागचे कारण म्हणजे मी आतून खूप घाबरलेलो होतो. केवळ वरून मजबूत दिसत होतो. मात्र या अपयशातून मी हे शिकलो की स्वतःला अगोदरच नकारात्मक बनवणे हिच मोठी हार आहे.

आता थांबु नकोस 
आता मला पुन्हा सुरवातीपासून तयारी करावी लागणार होती. दोन वेळेस अपयश हाती आल्यामुळे घरून मिळणार पाठिंबा सुद्धा कमी होत चालला होता. माझ्या निकालाने कुटुंबातील सर्वजण निराश झाले होते. या कठीण प्रसंगी मला माझ्या आईने साथ दिली. इथपर्यंत पोचला आहेस तर आता मागे वळून पाहू नकोस. एक उडी घे आणि आणि पुढे चालता हो. आईच्या या शब्दांमुळे मी निराशा सोडून देऊन पुन्हा परीक्षेची तयारी सुरु केली. एका महिन्याच्या आतच पूर्वपरीक्षा दिली आणि पास झालो.
यामुळे झाली निवड 
पूर्व परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर मुख्य परीक्षेची खूप मेहनत घेतली आणि मुलाखतीपर्यंत माझ्यामध्ये हा पूर्ण विश्वास निर्माण झाला होता की माझ्यामध्ये ते सर्व गन आहेत जे एका प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये असले पाहिजेत. मला लक्षात आले होते की स्वतः वर संशय घेणे हेच आपल्याला यशस्वी होण्यापासून रोकत असते. यूपीएससी चा अंतिम निकाल जेव्हा पहिला तेव्हा ७७ व्या रँकने मी ही परीक्षा पास झालो होतो. आज असे वाटत होते की गल्ली क्रिकेट आणि फुटबॉल खेळणारा मुलगा आज IAS झाला आहे. अनेक लोकांनी टोमणे लगावले तसेच माझ्या परिवाराला त्रास देण्याचा प्रयत्न ही केला. परंतु मला IAS व्हायचं होतं तेही कोणत्याही परिस्थितीत आणि मी हे करून दाखवलं. आता इथून पुढे भेटेल ते काम पूर्ण निष्ठने करणार आहे.
You might also like