रणवीर सिंगचा ‘अपरिचित’ बनण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   तमिळ मधला सुपरहिट चित्रपट ‘अनियान’, जो हिंदी मध्ये ‘अपरिचित’ म्हणून खूप प्रसिद्ध झाला, त्याचे दिग्दर्शक शंकर हे त्यांचा नवा चित्रपट बनवण्या अगोदरच प्रचंड वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शंकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर सगळीकडे हे जाहीर केले कि तामिळ मधील २००५चा सुपरहिट चित्रपट ‘अनियान’ चा हिंदी रिमेक ते लवकरच बनवणार असून बॉलीवूड चा सुपरस्टार म्हणजेच रणवीर सिंग ला मुख्य भूमिकेत घेणार आहेत. रणवीर सिंग मुख्य भूमिकेत असणार हे ऐकून सर्वच चित्रपट प्रेमींना आनंद झाला आहे. रणवीर सिंग हा एक असा कलाकार आहे जो कोणतीही भूमिका अतिशय एकनिष्ठतेप्रती साकारतो. एकीकडे, जिथे प्रेक्षांना या चित्रपटाची आतुरता आहे, तिथेच दुसरीकडे अनियान चे निर्माते व्ही. रविचंद्रन यांनी शंकर हे बेकायदेशीर कृत्यामध्ये सहभागी असल्याचे आरोप केले आहेत. रविचंद्रन यांच्या मते अनियान चे सर्व हक्क त्यांच्याकडे असून शंकर हे त्यांच्या परवानगी शिवाय चित्रपट बनवत आहेत. या मुले रविचंद्रन यांनी शंकर यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

रविचंद्रन म्हणाले, “मला हे वाचून धक्का बसला की ‘अन्नियन’च्या कथेवर आधारित हिंदी चित्रपट तुम्ही करत आहात. तुम्हाला ही गोष्ट चांगलीच माहित आहे की ‘अन्नियन’चा निर्माता मी आहे. लेखकाकडून ही कथा पूर्ण पैसे देऊन मी विकत घेतली आहे आणि त्यासाठीची सर्व कागदपत्रे माझ्याकडे उपलब्ध आहेत. या कथेचा पूर्णपणे मी मालक आहे. त्यामुळे माझ्या परवानगीशिवाय या कथेवर आधारित चित्रपट बनवणं अथवा कथेची कॉपी करणं हे सगळं बेकायदेशीर आहे. तुम्ही ही गोष्ट सोयीस्कररित्या विसरलात आणि मला न सांगताच माझ्या यशस्वी चित्रपटाचं श्रेय लाटायला निघाला आहात आणि त्याचा हिंदी रिमेकही करत आहात. मला कायम वाटायचं की तुम्ही तत्वनिष्ठ आहात आणि म्हणूनच मला आश्चर्य वाटत आहे की अशा बेकायदेशीर गोष्टी करण्यापर्यंतच्या खालच्या थराला तुम्ही कसे जाऊ शकलात?तुम्ही ही गोष्ट सोयीस्कररित्या विसरलात आणि मला न सांगताच माझ्या यशस्वी चित्रपटाचं श्रेय लाटायला निघाला आहात आणि त्याचा हिंदी रिमेकही करत आहात. मला कायम वाटायचं की तुम्ही तत्वनिष्ठ आहात आणि म्हणूनच मला आश्चर्य वाटत आहे की अशा बेकायदेशीर गोष्टी करण्यापर्यंतच्या खालच्या थराला तुम्ही कसे जाऊ शकलात?”

व्ही. रविचंद्रन यांनी या चित्रपटाचे काम तात्काळ थांबवायला लावलं आहे.