Urvashi Rautela | उर्वशीने केला सहकलाकाराचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख; होतीये जबरदस्त ट्रोल

पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ही नेहमी तिच्या वक्तव्यामुळे व सोशल मीडियावरील पोस्टमुळे लाईमलाईटमध्ये असते. अभिनेत्री व मॉडेल असलेली उर्वशी हिला नेहमीच तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे ट्रोल केले जाते. ती अनेकदा पब्लिक अटेंशन साठी अनेक प्रयोग करताना दिसून येते. मात्र य़ावेळी उर्वशी तिच्या अज्ञानामुळे ट्रोल केली जाते. तिने ट्वीटमध्ये अभिनेता पवन कल्याणला (Pawan Kalyan) आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री (Chief Minister of Andhra Pradesh) म्हटल्यामुळे उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) जबरदस्त ट्रोल होत आहे.

अभिनेत्री व मॉडेल उर्वशी ही तिच्या प्रोजेक्टपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. तिचा आज (दि.28) ‘ब्रो’ हा चित्रपट (Bro Movie) प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. यामध्ये ती अभिनेता पवन कल्याण सोबत स्क्रीन शेअर करणार आहे. प्रदर्शनाच्या पूर्वसंध्येला तिने एक चित्रपटाबाबत ट्वीट केले. मात्र या ट्वीटमध्ये तिने तिचा सहकलाकार पवन कल्याणला थेट आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री (Pawan Kalyan As of Andhra Pradesh CM) करुन टाकले आहे. तिचे हे ट्वीट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. उर्वशीच्या या चूकीची नेटकऱ्यांनी चांगली खिल्ली उडवली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी ( CM YS Jagan Mohan Reddy) आहेत.

Urvashi Rautela

अनेक नेटकऱ्यांनी मॉडेल उर्वशी रौतेला हिच्या ट्वीटला कमेंट करत तिची खिल्ली उडवली आहे. एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे की, “ट्वीट करताना थोडं भान ठेव, दारू पिऊन ट्वीट करू नकोस,” तर दुसऱ्याने लिहिले आहे की, “ही स्वघोषित मिस युनिव्हर्स आहे. आधी चित्रपटाचे कथानक टाकून टीमचा बदला घेणे आणि नंतर नायकाला मुख्यमंत्री म्हणून ट्रोल करणे.”

अनेकांनी उर्वशीच्या या ट्वीटवरुन तिला सुनावले आहे. ‘ब्रो’ हा एक तेलुगू चित्रपट आहे. यामध्ये पवन कल्याण, साई धरम तेज (Sai Dharam Tej), केतकी प्रकाश (Ketaki Prakash) व प्रिया प्रकाश वारियर (Priya Prakash Warrier) हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटातील एका गाण्यामध्ये उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) झळकणार आहे. चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटमधील फोटो उर्वशीने ट्वीटला शेअर केला. मात्र अभिनेत्याला थेट मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसवले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Selling a Commercial Property? 5 Key Tax Implications to Consider