Coronavirus Vaccine : जो बायडेन यांनी Live TV वर घेतली ‘कोरोना’ व्हॅक्सीन, लोकांनाही केले ‘हे’ अपील

नवी दिल्ली : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी कोरोना व्हायरसची व्हॅक्सीन घेतली आहे. 78 वर्षीय जो बायडेन यांनी लाइव्ह टीव्हीवर कोरोना व्हॅक्सीनचा पहिला डोस घेतला. जो बायडेन कोविड-19 च्या हाय रिस्क ग्रुपमध्ये येतात. त्यांनी फायजरने बनवलेल्या कोरोना व्हॅक्सीनचा डोस घेतला. नुकतीच अमेरिकेत फायजरच्या कोरोना व्हॅक्सीनची अधिकृत मंजूरी मिळाली आहे.

रिपोर्टनुसार, डेलावेयरच्या क्रिस्टियानाकेयर हॉस्पिटलमध्ये एका नर्सने सोमवारी दुपारी फायजर आणि बायोएनटेक द्वारे विकसित व्हॅक्सीनचा पहिला डोस जो बायडेन यांना दिला. द हिलच्या रिपोर्टमध्ये डोसच्या सुरक्षिततेबद्दल अमेरिकन नागरिकांना आश्वस्त करण्यासाठी हा कार्यक्रम लाइव्ह दाखवण्यात आला.

ज्यानंतर बायडेन यांनी म्हटले की, असे त्यांनी अमेरिकन लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्याच्या उद्देशाने केले आहे. व्हॅक्सीन घेण्यात कोणतीही चिंता किंवा भितीची बाब नाही.

अमेरिका कोरोना व्हायरसने सर्वात जास्त प्रभावित आहे. जो बायडेन यांनी अमेरिकेच्या जनतेला अपील केले आहे की त्यांनी कोणत्याही भितीशिवाय कोरोना व्हॅक्सीन घ्यावी. अमेरिकेत पुढील महिन्यात म्हणजे जानेवारी 2021 पासून कोरोना व्हॅक्सीन सामान्य लोकांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

जगभरात सध्या कोरोनाने संक्रमित लोकांची एकुण संख्या 77,172,237 झाली आहे. या महामारीने आतापर्यंत 1,699,644 लोकांचा जीव घेतला आहे. जगभरात कोरोना व्हायरसने संक्रमित 54,089,577 लोक बरे झाले आहेत.

तर अमेरिकेत कोरोनाचा प्रभाव सर्वात जास्त दिसून आला आहे. अमेरिकेत कोविड-19 रूग्णांची संख्या 18,267,579 झाली आहे आणि 3,24,404 लोकांचा मृत्यू झाला आहे.