धक्कादायक ! माहेरी जाणाऱ्या महिलेला रस्त्यात अडवलं, पतीसमोरच तिघांनी केला सामुहिक बलात्कार, केलं मोबाईलमध्ये चित्रीकरणही

पोलीसनामा ऑनलाईन : पतीसोबत दुचाकीवरून माहेरी निघालेल्या महिलेला रस्त्यात अडवून तिघांनी पतीसमोरच सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातून समोर आली आहे. इतकेच नाही, तर आरोपीनी घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण देखील केले आहे. आग्रा येथे सोमवारी (दि. 29) सायंकाळी ही घटना घडली आहे. पीडित महिलेने याबाबत एत्माद्दौला पोलीस स्थानकात 3 जणांविरोधात तक्रार केली आहे. या घटनेमुळे उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

पीडित महिलेने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार, पिडित महिलेचे माहेर एत्माद्दौला परिसरात तर सासर एत्मादपूरमध्ये आहे. सोमवारी संध्याकाळी 6 सुमारास ती पतीसोबत दुचाकीवरून माहेरी जात होती. त्यावेळी वाटेत तिघांनी अडवून मारहण केली. तसेच आम्हाला रस्त्याच्या बाजूला झाडा-झुडपांमध्ये घेऊन गेले. तिथे पतीसमोरच तिघांनी बलात्कार केला. इतकेच नाही, तर घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले आहे. तसेच 10 हजार, सोन्याचे कानातील दागिने हिसकावून घेतले आहे. त्यानंतर घडलेल्या प्रकाराची कुठेही वाच्यता केली तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीनी पळ काढला. त्यानंतर मंगळवारी दुपारी पीडित दांम्पत्याने पोलिस स्थानकात जाऊन तक्रार केली. पोलीस अधिक्षक आर.ए. सत्यजीत गुप्ता म्हणाले की, सामूहिक बलात्कार, लुटमार आणि जीवे मारण्याची धमकीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडितेला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवले आहे. लवकरच आरोपींना अटक केले जाईल.