Vaikunth Smashan Bhoomi Pune | वैकुंठ स्मशानभूमी येथील वायू प्रदुषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

पुणे : Vaikunth Smashan Bhoomi Pune | वैकुंठ स्मशानभूमी नवी पेठ (Navi Peth, Pune) येथील वायू प्रदुषणाच्या अनुषंगाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक घेऊन पुणे महानगरपालिकेला आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. (Vaikunth Smashan Bhoomi Pune)

व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथे झालेल्या या बैठकीस महानगरपालिकेचे Pune Municipal Corporation (PMC) अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार (IAS Dr Kunal Khemnar), विकास ढाकणे (Vikas Dhakane PMC), पुणे महानगर पालिकेचे विद्युत विभागाचे श्रीनिवास कंदुल (Shrinivas Kandul PMC) आदी उपस्थित होते.

वैकुंठ स्मशानभूमीच्या धुरामुळे स्मशानभूमीच्या बाजूच्या सोसायट्यांना धुराचा त्रास होत असल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने पालकमंत्री पाटील यांनी सूचना दिल्या, वैकुंठ स्मशानभूमीतील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी तेथे वापर होत असलेले लाकडावरील शवदहन कमी करावे आणि लाकडावरील दहन ऐवजी विद्युत व गॅस दहिनीची उभारणी करावी. (Vaikunth Smashan Bhoomi Pune)

वैकुंठ स्मशानभूमी परिसरातील लोकांची समस्या दूर करण्यासाठी स्थानिक नागरिकांबरोबर एक समिती गठीत करून तेथील व्यवस्थापनाबाबत अहवाल तयार करण्याबाबत सूचना पाटील यांनी दिल्या. चिमणीची उंची वाढवणे, हवेत जाणाऱ्या धुराचे प्रमाण कमी करण्यासाठी एक ड्राय स्क्रबरची उभारणी करणे आदी उपाययोजना कराव्यात अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

डॉ. खेमणार यांनी माहिती दिली, पुणे महानगरपालिका क्षेत्रात १० विद्युत दाहिन्या, १३ गॅस दाहिन्या,
१ हायब्रीड दाहिनी तसेच २३ ए.पी.सी. यंत्रणा असे एकूण ४७ यंत्रणा शवदहनासाठी उपलब्ध आहेत.
नागरिकांनी विकेंद्रित स्वरुपात या सुविधांचा वापर केल्यास वैकुंठ प्रमाणे एकाच ठिकाणी जास्त ताण येणार नाही,
असेही यावेळी सांगण्यात आले. त्यदृष्टीने पर्यावरण रक्षणासाठी सहकार्य करण्याबाबत नागरिकांना
आवाहन करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

नीरी आणि महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियामक मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करुन विविध उपाययोजना
सुचविल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत असल्याचे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title :-  Vaikunth Smashan Bhoomi Pune | Guardian Minister Chandrakant Patil’s instructions to take necessary measures to prevent air pollution at Vaikunth Crematorium

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Cyber Crime News | पुण्यातील पोलिसाने 5 भाषेतून आदरयुक्त ‘आदेश’ देवून हस्तगत केले 9 राज्यातून 51 हरवलेले मोबाईल

Chandrashekhar Bawankule | उद्धव ठाकरेंकडून मोदींचा एकेरी उल्लेख, बावनकुळे संतापले, म्हणाले- ‘बोलताना जरा तारतम्य बाळगा’ (व्हिडिओ)

CM Eknath Shinde | ‘झोळी लटकवून निघून जाशील…’, उद्धव ठाकरेंच्या पंतप्रधानांवरील टीकेला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर, म्हणाले… (व्हिडिओ)