Valentines Day Offer : iPhone 12 Mini सह अनेक स्मार्टफोन्सवर मिळतोय मोठा डिस्काउंट; एकदा पाहाच !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘व्हॅलेंटाईन डे’ आठवडा म्हणून हे दिवस साजरा केले जात आहेत. त्यानुसार, अनेक कंपन्यांकडून स्मार्टफोन्सवर डिस्काउंट दिला जात आहे. ऍमेझॉन आणि फ्लिपकार्टवर काही स्मार्टफोन्सवर डिस्काउंट मिळत आहे. त्यामध्ये iPhone, Galaxy S21 सह Mi 10T या स्मार्टफोनचा समावेश आहे.

ऍमेझॉनवर iPhone 12 Mini वर डिस्काउंट दिल्यानंतर हा फोन 65,900 रुपयांना मिळणार आहे. याशिवाय HDFC बँक क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 6,000 रुपयांची सूट दिली जात आहे. तर एक्सचेंजवर 12,400 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. HDFC ची ऑफर स्टॅँडर्ड iPhone 12 वरही लागू असणार आहे. या फोनमध्ये ग्राहकांना फक्त चार्जिंग केबल मिळणार आहे. तर ऍडॅप्टर ग्राहकांना खरेदी करावा लागेल.

ग्राहकांना Apple MagSafe चार्जरसाठी 4,500 रुपये एक्स्ट्रा देऊन खरेदी करावा लागणार आहे.

Samsung Galaxy S12 5G : कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवर हा फोन 69,999 रुपयांमध्ये मिळू शकेल. ही किंमत 8GB + 128GB वेरियंटची आहे. Samsung Days सेल या ऑफरनुसार HDFC बँक कार्ड्सवर 5,000 रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक आणि एक्सचेंजसह 10,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळतो.

Galaxy S21 : Samsung Shop App वर ग्राहकांना 2,000 रुपयांचा ऍडिशनल डिस्काउंटही मिळत आहे. म्हणजेच Galaxy S21 स्मार्टफोन 60,000 रुपयांपेक्षाही कमी किमतीत खरेदी करता येऊ शकतो.

Samsung Galaxy S 21 Ultra 5G : सॅमसंगचा हा स्मार्टफोन HDFC बँकेच्या कार्ड्सवर 7,000 रुपयांपर्यंत इन्स्टंट कॅशबॅक, एक्सचेंजवर 10,000 रुपयांपर्यंत सूट आणि 2,000 रुपयांचा ऍडिशनल डिस्काउंट मिळतो.

Oppo Reno 5 Pro 5G : Oppo कंपनीचा हा स्मार्टफोन 35,990 रुपयांऐवजी 33,490 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तसेच हा स्मार्टफोन HDFC बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 2,500 रुपयांचा डिस्काउंट मिळतो.

Xiaomi Mi 10T : Xiaomi Mi 10T सीरिजवर ICICI बँक क्रेडिट कार्ड आणि EMI ट्रान्सझॅक्शनसह 3000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.