वारणावती : चांदोली धरणाचे चारही दरवाजे उघडले

वारणावती : पाेलीसनामा ऑनलाईन

वारणावतीमध्ये गेली चार दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. चांदाेली धरणक्षेत्रातही पावसाने दमदार हजेरी लावली असल्याने चांदाेली धरण माेठ्या प्रमाणात भरले आहे. चांदाेली धरणाच्या सांडव्याने पातळी आेलांडली असता, अाज सकाळी दहा वाजताच्या सुमारास चांदाेली धरणाचे चार दरवाजे ०.५० मिटर उचलून २१०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वारणा नदीत करण्यात आला अाहे. त्यामुळे वारणा नदी सुध्दा पात्राबाहेर गेली अाहे.
[amazon_link asins=’B0798R8SZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d4e0a467-8816-11e8-9ba7-45602bd934dd’]

या बाबत सविस्तर वृत्त असे की, वीजनिर्मिती केंद्रातून ५९२ व उच्च स्तर द्वारातून ८०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे सर्व मिळून ३४९२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात होत आहे.  मुसळधार पाऊस त्यातच धरणातून सुरू केलेला विसर्ग वीजनिर्मिती केंद्रातून येणारे पाणी यामुळे वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन पाणी पात्राबाहेर गेले आहे. नदीकाठची शेकडो एकर शेती पाण्याखाली आहे. दरम्यान पावसाचा जोर वाढल्यास धरणातील विसर्ग आणखी वाढविण्यात येणार आहे.
[amazon_link asins=’B01N0WVC16′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’db140404-8816-11e8-8fa1-935da667a2dd’]

जिल्हाप्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ४५ दिवस म्हणजे दीड महिना अगोदरच धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेला 8८१० मिलिमीटर पाऊस पडला होता यंदा त्याचे प्रमाण १३२४ मिलीमीटर इतके आहे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ५१४ मिलिमीटर पाऊस अधिक पडला आहे.