वसई : NGO च्या नावाखाली सुरू होतो ‘गोरख’ धंदा, पोलिसांनी पर्दाफाश करत केली दोघींची सुटका

वसईः पोलीसनामा ऑनलाईन – वसईत एका सामाजिक संस्थेच्या नावाखाली सुरु असलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी येथे मंगळवारी (दि. 17) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास छापा टाकून एका महिलेला अटक केली असून 2 पीडित महिलांचा सुटका केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वसईच्या कृष्णा टाऊनशीप या उच्चभ्रू परिसरात आरोपी महिला सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास एक बोगस ग्राहक पाठवून तिथे सेक्स रॅकेट सुरू असल्याची खातरजमा करून घेतली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून 2 पीडित महिलांची सुटका केली आहे. तर एका आरोपी महिलेला अटक केली आहे. नालासोपारा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी अटक महिलेवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे.