Vastu Tips : देवघरात ठेवा ‘या’ 5 वस्तू ! संपुष्टात येईल पैशाची चणचण

पोलिसनामा ऑनलाईन – वास्तुचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. वास्तू मध्ये खूप काही सांगितलं आहे. पूजाघरात काय असावं किंवा नसावं याबद्दल यात सांगितलं आहे. अशा काही वस्तू आहेत ज्याचा रोज तर काही उपयोग होत नाही, परंतु त्या वस्तू जर पूजाघरात ठेवल्या तर घराला समृद्धी येते. धनाची देवी लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि घरावर कायम आपला आशीर्वाद ठेवते. त्या वस्तू कोणत्या आहेत हे आपण पाहणार आहोत.

1) गंगाजल – गंगेला प्राणदायिनी आणि जीवनदायिनी मानलं जातं. पूजाघरात लहान पितळ्याच्या किंवा चांदीच्या भांड्यात गंगाजल ठेवावं. रोज त्याची पूजा करावी. पौर्णिमा किंवा एकदशी दिवशी घरात गंगाजल शिंपडावं. हे पवित्र मानलं जातं. यामुळं घरातील नकारात्मक शक्तींचा नाश होतो.

2) मोरपंख – संस्कृती आणि पौराणिक गृहितकानुसार, मोरपंखाला भगवान श्री कृ्ष्णाचा अंश मानलं जातं. पूजाघरात मोरपंख असणं गरजेचं आहे. यामुळं कुणाचीही वाईट नजर घरावर पडत नाही. काही लोक असंही मानतात की, पूजाघरात मोरपंख असेल तर घरात जीव जंतु येत नाहीत.

3) गोमुत्र किंवा गौघृत – गायीला हिंदू धर्मात देवीचं स्थान दिलं आहे. पूजा करताना गोमुत्राचा उपयोग केला जातो. तसंच गौघृत सुद्ध पूजेसाठी महत्त्वाचं मानलं जातं. पूजाघरात या दोन वस्तू असाव्यात.

4) शंख – पूजा करण्याच्या जागेवर शंख असणं महत्त्वाचं मानलं जातं. दक्षिणावर्ती शंखाच्या आवाजानं तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मक शक्ती नष्ट होते. यामुळं वातावरण भक्तीमय होऊन जातं. गुरुवारी दक्षिणावर्ती शंखानं भगवान विष्णुची पूजा केली तर शुभ फलाची प्राप्ती होते.

5) शाळीग्राम – पूजेत याचाही समावेश असावा. रोज नियमित तुळशीचं पान असलेल्या पाण्यानं त्याला अंघोळ घालावी. असं केल्यानं भगवान विष्णुच्या सर्व अवतारांचा आशीर्वाद मिळतो. पौराणिक मान्यतेनुसार ज्या घरात नियमित शाळीग्रामची पूजा होते त्या घरात गरिबी येत नाही आणि लक्ष्मी मातेचा सदैव वास राहतो.