Vastu Tips | घरात ठेवलेल्या या 6 वस्तू बनू शकतात तुमच्या आर्थिक तंगीचे कारण, ताबडतोब घरातून बाहेर काढा

नवी दिल्ली : Vastu Tips |आपल्या जीवनात ग्रहांना विशेष महत्व असते. त्यांच्या चांगल्या-वाईट स्थितीचा आपल्या जीवनावर परिणाम होतो. एखाद्या ग्रहाची दशा-दिशा ठिक नसेल तर जीवनात अनेक समस्या येऊ शकतात. तुमची होणारी कामे बिघडू लागतात. जर तुम्ही आर्थिक संकटाशी सामना करत असाल किंवा पैसा कमावण्याचे नवीन मार्ग शोधत असाल तर समस्यांचा सामना करावा लागतो.

वास्तुशास्त्रानुसार, अनेकदा दोषामुळे सुद्धा आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो. वास्तुशास्त्रानुसार घरात अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आर्थिक तंगीचे मुख्य कारण आहेत, ते जाणून घेवूयात.

1 झाडू
झाडू नेहमी लोकांच्या नजरेपासून दूर ठेवा. झाडू लक्ष्मीचे रूप असल्याने नेहमी सोफा किंवा बेडच्या खाली ठेवा. तो उभा ठेवू नका. झाडू नेहमी आतून बाहेर काढा. बाहेरून आत काढल्यास दारिद्रय येते.

2 घरात खराब वस्तू ठेवू नका
वास्तुनुसार, घरात बिघडलेले घड्याळ, तुटलेले इलेक्ट्रॉनिक सामान, मातीची तुटलेली भांडी, तुटलेले फर्नीचर ठेवू नका. अशा गोष्टी ताबडतोब घरातून बाहेर काढा.

3 कबूतराचे घरटे
वास्तुनुसार, कबूतराचे घरात येणे-जाणे, अंडे देणे किंवा ते फुटणे या सर्वामुळे होणार्‍या घाणीमुळे आर्थिक तंगी येते. हे बुध ग्रहाचे प्रतिनिधीत्व करते. घराच्या छतावर पक्षांना खायला टाकून नका, दूर टाका. कबूतरे घरात येणे आर्थिक तंगीचे लक्षण आहे.

4 काटेरी झाडे, रोपे लावू नका
वास्तुनुसार, घरात काटेरी किंवा दूध येणारी रोपे लावू नये. आर्थिक तंगी येऊ शकते.

5 घरात ओलावा किंवा भिंतीला छद
वास्तुनुसार घरात ओलावा येणे शनी आणि राहुचे खराब कॉम्बिनेशन आहे, जे चंद्रावर भारी पडते.
ओलावा आल्याने भिंतीची पापडी निघते, त्याप्रमाणे पैसा कमी होतो. स्कीन इन्फेक्शनचा धोका वाढतो.

6 जिन्याखाली स्वयंपाक घर नको
वास्तुनुसार, स्वयंपाक घर खुप महत्वाचा भाग आहे. कधीही घर बांधताना जिन्याच्या खाली स्वयंपाक
घर किंवा टॉयलेट बनवू नका. याशिवाय बूट-चप्पल जिन्याच्या खाली ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार,
जिना जीवनात उंचीवर घेऊन जातो. यासाठी अशी वास्तू बनवणे टाळले पाहिजे.

हे देखील वाचा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : vastu tips money know about these six things can cause money loss

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update