Vaastu : घरातील ‘या’ ठिकाणी चुकूनही ठेवू नका तुळशीचे रोप, होईल धन आणि बुद्धीची हानी

पोलिसनामा ऑनलाईन – Vaastu हिंदू धर्मग्रंथात तुळशीच्या रोपाला कृष्णाचे स्वरूप मानले गेले आहे. तुळस बुधाचे प्रतिनिधीत्व करते. अनेक घरात याची पूजा सुद्धा केली जाते. तुळशीचे रोप अनेक दोष दूर करते. चांगले जीवन सुद्धा प्रदान करते. देवी-देवतांची कृपा होण्यास सहायक आहे. परंतु हे जर योग्य ठिकाणी ठेवले गेले नाही तर अशुभ फळ सुद्धा देते. तुळशीचे रोप कुठे ठेवू नये ते जाणून घेवूयात…

हे टाळा
* वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप घराच्या छतावर ठेवल्याने अशुभ फळ मिळते.

* ज्यांची कुंडली बुध, धनाशी संबंधीत आहे, त्या लोकांना तुळस छतावर ठेवल्यास आर्थिक हानी होते.

* घराच्या छतावरील तुळशीच्या रोपात चिमणी किंवा कबुतराने घरटे बनवले तर ही वाईट केतुची निशाणी आहे.

* तुळशीचे रोप पूर्व दिशेला सुद्धा ठेवू नये. यामुळे व्यापारात हानी होते, ज्याचा कुटुंबावर नकारात्मक परिणाम होतो.

* जर तुळशीचे रोप छतावर ठेवले तर उत्तर दिशेला मुंग्या निघू लागतात. तसेच उत्तर दिशेला कुठे ना कुठे भेगा पडण्यास सुरूवात होईल.

हे काम करा होईल लाभ
* तुळशीचे रोप नेहमी उत्तर दिशेपासून ईशान्य कोपर्‍यापर्यंत ठेवू शकता. तसेच पश्चिम दिशेला ठेवू शकता. यामुळे घरात सकारात्मक उर्जा येते.

* तुळशीची पाने कधीही चावून खाऊ नयेत तर जीभेवर ठेवून चघळून खावीत.

* तुळशीची पाने दह्यात मिसळून खाल्ल्याने आरोग्यासंबंधी अनेक विकार दूर होतात. दिवसभर उर्जा मिळते.

* तुळशीच्या रोपाची रोज पूजा करण्याने घरातील सदस्यांमध्ये सुरू असलेले वाद दूर होतात.

* तुळशीचे रोप स्वयंपाक घराजवळ ठेवल्याने घरातील सदस्यांमध्ये सामंजस्य वाढते. कौटुंबिक प्रेम आणि सद्भावात वाढ होते.