Veena Jagtap | “तुम्ही तुमच्या हृदयात ज्या गोष्टी लपवता त्या…” अभिनेत्री वीणा जगतापची पोस्ट चर्चेत

पोलीसनामा ऑनलाइन- छोट्या पडद्यावरील ‘राधा प्रेम रंगी रंगली’ आणि ‘मराठी बिग बॉस 2’ य़ा मधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री वीणा जगताप (Veena Jagtap) अनेकदा तिचे मत सोशल मिडियावर स्पष्टपणे व्यक्त करत असते. तिचे बिग बॉसमधील शिव ठाकरे (Shiv Thakare) सोबत असणाऱ्या नात्यामुळे ती चर्चेत असते. त्यांचे बिग बॉसच्या घरात सूत जुळले. घराबाहेर आल्यानंतर त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली देखील दिली. अनेकदा ते एकत्र फिरताना दिसत असत. मात्र नंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. (ShivVeena) यामुळे त्यांचे फॅन नाराज झाले. अभिनेत्री वीणा जगतापने (Veena Jagtap) नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या या पोस्टची चर्चा सर्वत्र आहे.

अभिनेत्री वीणा जगतापने राधा प्रेम रंगी रंगली, आई माझी काळुबाई या मालिकांमध्ये काम केले आहे. ती बीग बॉस मराठीमुळे (Marathi Bigg Boss) प्रकाशझोतात आली. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पांढऱ्या रंगाच्या ड्रेस परिधान केलेला फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो खूप व्हायरल होत आहे. वीणाने पोस्ट केलेल्या या पोस्टमध्ये तिने ख्रिश्चन पद्धतीचा गाऊन परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोखाली तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “तुम्ही तुमच्या हृदयात ज्या गोष्टी लपवता, त्या तुमच्या नजरेत दिसतात”, आणि सोबत रेड हार्ट इमोजीही शेअर केला आहे.

वीणा तिच्या या पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली असून आता तिला चाहते कमेंटस् करत आहे. तिला कमेंटमध्ये चाहत्यांनी लिहिले आहे की, वीणा दी आम्ही तुला नेहमीच मिस करतो आणि तुमचे एकत्र राहणे. #shiveena. दुसऱ्या युजरने लिहिले की, ब्युटीफूल डॉल. तर आणखी एका नेटकऱ्याने लिहीले आहे की, खूप सुंदर दिसत आहात. वीणाची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.मात्र वीणा जगताप बऱ्याच मोठ्या कालावधीपासून इंडस्ट्रीमधून गायब आहे. (Veena Jagtap)

Web Title :  Veena Jagtap | marathi actress veena jagtap wear christian wedding dress share post see caption

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Major General Smita Devrani and Brigadier Amita Devrani Receive Prestigious National Florence Nightingale Awards for Exemplary Service in Nursing

Unveiling the Truth: Atal Bihari Vajpayee, the Right Man in the Right Party

C-DAC Collaborates with Bharati Vidyapeeth (Deemed to be University) College of Engineering, Pune, to Introduce New Technical Courses

Lonavla Residents Duped in Chardham Yatra Scam: 37 Victims Seek Justice

Autorickshaw Driver Arrested for Stealing Temple Bell: Kondhwa Police Crack the Case

India Takes Flight: Pioneering Female Representation among Commercial Pilots Globall