Video : मंदिरा बेदीने सांगितला ऑक्सिजन लेव्हल वाढवण्याचा उपाय, शेअर केला वर्कआऊट व्हिडीओ

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. अशा परिस्थिती ऑक्सिजन अभावी अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशावेळी ऑक्सिजन लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करावे याचा शोध अनेकजण घेताना दिसत आहेत. दरम्यान अभिनेत्री मंदिरा बेदीने नुकताच आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मंदिरा चक्रासन करताना दिसत असून यात तिने बॅकबेंड योगा पोज दिली आहे. अशाप्रकारचा वर्कआऊट करून तुम्ही आपल्याला ऑक्सिजन लेव्हल वाढवता येऊ शकते. या व्यायाम प्रकाराने ताणतणाव कमी होण्यास मदत होते. मंदिराच्या फॅन्सनी या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्स वर्षाव केला आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना मंदिराने कॅप्शनमध्ये लिहले आहे की, यामुळे तुमची ऑक्सिनजन लेव्हल वाढते. तसेच ताणतणावही कमी होतो. तुमची पाठ, कंबर, मजबूत होते. मनाला आनंद मिळतो. मंदिराच्या या व्हिडीओवर कमेंट करत एका युजरने म्हटले आहे की, तुम्हाला पाहूनही ऑक्सिजन लेव्हल वाढली आहे. तुम्ही खूपच फिट, शानदार आहात असे म्हणत कौतुकाचा वर्षाव केला आहे. मंदिरा दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही. नेहमीच तिच्या वर्कआऊट व्हिडीओ आणि फोटोमुळे इतरांना प्रेरणा देत असते. तिच्याकडे पाहून कुणालाही वाटणार नाही की तिने वयाची चाळीशी ओलांडली आहे. या वयातही मंदिरा बेदीने उत्तम फिगर मेंटेंन केली आहे. मंदिरा नेहमीच सोशल मीडियावर आपले फिटनेस व्हिडीओज शेअर करत असते. फिट राहण्यासाठी जिमला जाण्याबरोबरच योगा आणि स्विमिंगसुद्धा करत असते.