घोडेबाजार टाळण्यासाठी विधानपरिषदेच्या सर्व जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन

विधानपरिषदेच्या निवडणूकीत घोडेबाजार टाळण्यासाठी विधानपरिषदेच्या ११ जागांची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सर्वपक्षांकडून करण्यात येत आहे. ११ जागांपैकी ५ जागांवर भाजप उमेदवार देणार आहे. तर शिवसेना २, काँग्रेस २ आणि राष्ट्रवादी एका जागेवर आपला उमेदवार उभा करणार आहे. तर अकरावा उमेदवार म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील अर्ज भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ११ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्याचा (गुरुवार) शेवटचा दिवस आहे. ११ जागांसाठी १६ जुलैला मतदान होणार आहे आणि याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होणार आहे.

[amazon_link asins=’B07CRM1F9D’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5d30c3f1-7f78-11e8-9761-0db3e4a374be’]

कोणत्या पक्षाचे उमेदवार कोण

भाजपकडून यांची नावे जवळपास निश्चित – भाई गिरकर, महादेव जानकर, कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील, उद्योजक मिलिंद कांबळे, नीलय नाईक (वसंतराव नाईक यांचे नातू)

शिवसेना – अनिल परब आणि मनिषा कायंदे

काँग्रेस – शरद रणपिसे आणि डॉ. वजाहत मिर्झा

राष्ट्रवादी काँग्रेस – उमेदवार जाहीर नाही

कोणत्या सदस्यांचा कार्यकाळ संपणार

भाजपचे भाई गिरकर, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, संजय दत्त, शरद रणपिसे, शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदेव गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र पाटील, सुनिल तटकरे, अमरसिंह पंडित, शेकापचे जयंत पाटील, रासपचे महादेव जानकर यांची मुदत संपत आहे.