करण जोहरची घोषणा ! विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेला घेऊन बनवणार अॅक्शन सिनेमा Liger

साऊथ ॲक्टर विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) लवकरच एका ॲक्शन सिनेमात काम करताना दिसणार आहे. नुकतीच त्यानं या अपकमिंग सिनेमाची घोषणा केली आहे. लायगर (Liger) असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमात विजय सोबत बॉलिवूड ॲक्ट्रेस अनन्या पांडे (Ananya Panday) काम करताना दिसणार आहे. करण जोहर (Karan Johar) या सिनेमाची निर्मिती करणार आहे.

सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा एक ॲक्शन थ्रिलर सिनेमा असणार आहे. पुरी जगन्नाथ हा सिनेमा डायरेक्ट करणार आहेत. हा सिनेमा हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम अशा एकूण 5 भाषेत रिलीज होणार आहे.

करण जोहरनं सिनेमाचं फर्स्ट पोस्टर शेअर केलं आहे. पोस्टर शेअर करताना त्यानं लिहिलं की, बिग स्क्रीन आणि मनावर राज्य करणाऱ्या विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांचा सिनेमा लायगर सादर करत आहे.

हा सिनेमा करण जोहर, चार्मी कोर, अपूर्व मेहता आणि हिरू यश जोहर प्रोड्युस करत आहेत. या सिनेमात राम्या कृष्णन, रोनित रॉय आणि विशु रेड्डी असे स्टार्स काम करताना दिसणार आहेत.

जशी या सिनेमाची घोषणा झाली आहे तसा सोशल मीडियावर लायगर ट्रेंड करताना दिसत आहे. सिनेमाचं फर्स्ट पोस्टर पाहून चाहते आणखीच उत्सुक झाले आहेत. लोकांना आशा आहे की, विजय सोबत अनन्यांची जोडी छान वाटणार आहे.