Vijay Wadettiwar | विरोधी पक्षनेते वडेट्टीवार आज ओबीसींच्या मंचावर, म्हणाले – ”समाजाच्या हक्कासाठी मी सभेला जातोय”

मुंबई : Vijay Wadettiwar | मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नेतृत्वात आज जालन्यातील अंबड येथे ओबीसी आरक्षण (OBC Reservation) बचाव एल्गार सभा होत आहे. या सभेला विरोधी आणि सत्ताधारी नेते एकाच मंचावर येत आहेत. विशेष म्हणजे काँग्रेस नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार देखील या सभेला उपस्थित राहणार असल्याने अनेकांना आश्चर्य वाटले आहे. याबाबत वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी प्रतिक्रिया देताना, मी ओबीसी समाजाच्या हक्कासाठी सभेला जातोय, असे म्हटले आहे. दरम्यान, अंबडच्या सभेसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, ओबीसी हा मोठा वर्ग आहे. या समाजाच्या हक्कांचे संरक्षण करणे आमचे कर्तव्य आहे. समाजाच्या हक्कासाठी मी सभेला जात आहे.

जालन्यातील अंबडच्या सभेला मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde), रासपचे महादेव जानकर (Mahadev Jankar), शब्बीर अन्सारी, आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) इत्यादी नेते उपस्थिती राहणार आहेत.

सभेला जाण्यापूर्वी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar) म्हणाले, ओबीसी हा मोठा वर्ग आहे. या समाजाच्या हक्कांचे संरक्षण करणे आमचे कर्तव्य आहे. समाजाच्या हक्कासाठी मी सभेला जात आहे. दुसऱ्याच्या हक्काचे कोणी हिरावून घेऊ नये. संविधानाच्या संरक्षणचे कवच आहे ते तोडण्याचे काम कोणी करू नये.

तर भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या, मी काही संदेश देणार नाही या बाबत अनेकदा व्यक्त झाले आहे.
माझ्या शिव शक्ती यात्रेत ही मांडले आहे. ज्यावेळी घटना घडल्या, त्या वेळी माझी भूमिका मांडली आहे.
आता वेगळे काही मांडण्याची आवश्यकता नाही. माझी भूमिका स्पष्ट आहे, माझ्या फॉलोअर्सला माहिती आहे.
सभेला मी मनापासून शुभेच्छा देते, छगन भुजबळ हे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्याविषयी आदर आणि प्रेम आहे.
मुंडे साहेबांनी जी वंचिताची चळवळ उभी केली त्याच्यात एक सच्चा मित्र म्हणून ते सोबत होते.
ते काय बोलतात या विषयी उत्सुकता आहे.

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange Patil)
यांनी ज्या जालन्यातून सुरूवात केली तेथेच सभा घेत मंत्री छगन भुजबळ यांनी एक प्रकारे आव्हान दिल्याचे बोलले जात आहे.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

प्रकाश शेंडगेंच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंचे स्पष्टीकरण, म्हणाले – ”छगन भुजबळांना पाडायचे आमच्या…”