‘NASA’ च्या ‘फोटो’ने उलगडू शकते ‘विक्रम लँडर’चे रहस्य, ‘ISRO’साठी आज महत्वाचा दिवस

पोलीसनामा ऑनलाइनभारतीय आवकाश संशोधन संस्था (ISRO) ने चांद्रयान 2 मिशनच्या विक्रम लँडर संबंधित विश्लेषणच्या मदतीसाठी अमेरिकन स्पेस एजेंसी नासा आपल्या लूनर ऑर्बिटरच्या माध्यमातून विक्रमच्या लँडिंग साइटचे फोटो सादर करणार आहे. नासाचे हा ऑर्बिटर 17 सप्टेंबरला (आज) विक्रमच्या लँडिंग साइटच्या वरुन आणि चंद्रला चक्कर मारुन जवळून जाणार आहे. 

 
नासाच्या लूनर रिकॉनिस्सेंस ऑर्बिटरकडून अपेक्षा –
परंतू चिंता व्यक्त करण्यात येत आहे की, लँडर विक्रम आणि त्याच्या लँडिंग साइटचे फोटे अंधूक येऊ शकतात कारण त्यावेळी अंधार असण्याची शक्यता आहे. परंतू अजून हे ही स्पष्ट झाले नाही की नासाचा ऑर्बिटर लँडिंग साइटपासून किती वाजता पोहचणार आहे.

नासाच्या ऑर्बिटरचे नाव लूनर रिकॉनिस्सेंस ऑर्बिटर आहे. 7 सप्टेंबरला सुरुवातीला 2.1 किमीच्या अंतरावरुन विक्रम लँडरचा इसरोशी संपर्क तुटला होता. यानंतर चांद्रयान 2 च्या ऑर्बिटरच्या मदतीने विक्रमचा पत्ता लागला होता. परंतू विक्रमशी अजूनही संपर्क झालेला नाही. 

 
फोटोंनी विक्रम लँडरचे कोणते रहस्य उलगडणार –
आजच्या फोटोवरुन हे स्पष्ट होईल की विक्रम लँडर चंद्रवर कोणत्या स्थितीत पडला आहे. हे फोटो इसरोला मदत करु शकतात. इसरोकडून सांगण्यात आले की विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहे. 

 

 

You might also like