डॉक्टरने एकट्याने घेतली कोरोना व्हॅक्सीन तेव्हा बायकोने असे केले हाल ! भांडणाचा व्हिडिओ वायरल

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात कोरोना लसीकरण अभियान 16 जानेवारीपासून सुरू झाले आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात हेल्थ वर्कर्सना डोस दिला जात आहे. यामध्ये एक असेही डॉक्टर आहेत, ज्यांचा व्हिडिओ सध्या खुप वायरल होत आहे. तो वायरल होण्याचे कारण आहे त्यांची बायकोसोबत फोनवर झालेली चर्चा. हा व्हिडिओ पाहून-ऐकून कुणाच्याही चेहर्‍यार हासू येणे स्वाभाविक आहे.

हा व्हिडिओ आहे कार्डियोलॉजिस्ट आणि पद्मश्रीने सन्मानित डॉक्टर के. के. अग्रवाल यांचा…झाले असे की, ते कोरोना लसीकरण सेंटरवर डोस घेण्यासाठी गेले. तिथे त्यांनी डोस घेतला. यानंतर त्यांच्या पत्नीचा त्यांना कॉल आला. यावेळी त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड होत होता.

 

 

 

 

डॉ. अग्रवाल यांनी पत्नीला सांगितले की, त्यांनी कोरोनाची लस घेतली आहे. यानंतर पलिकडून त्यांची पत्नी त्यांच्यावर भयंकर संतापली. पत्नीचे म्हणणे होते की, मलापण तुम्ही सोबत का घेऊन गेले नाही?

व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे की, मी विचारायला गेलो होतो तुमच्या बद्दल, ते म्हणाले रिकामे आहे, घ्या डोस, मग मी घेतला. यानंतर त्यांची पत्नी म्हणते की, मला तुम्ही सोबत का घेऊन गेले नाही. माझ्याशी खोटं बोलू नका. आता पत्नीला शांत करण्यासाठी डॉ. अग्रवाल अखेर म्हणाले, मी टीव्हीवर लाइव्ह आहे. यावर त्यांची पत्नी म्हणाली, मी सुद्धा लाइव्ह येऊन तुमची एैशी तैशी करते. फोनवर झालेली दोघांची बातचीत खुप वायरल होत आहे.

हा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर डॉ. अग्रवाल यांनी सुद्धा एक वक्तव्य जारी केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, मला माहित आहे माझा एक व्हिडिओ सध्या वायरल होत आहे. मला चांगले वाटले की, मी लोकांना या कठिण काळातही हसण्याचे एक साधन उपलब्ध करून दिले.