विराटची “विराट ” कामगिरी, तिस-यांदा ‘क्रिकेटर ऑफ द इयर’

मुंबई  : वृत्तसंस्था

आपल्या उत्कृष्ट कामगिरीवर लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या विराट कोहलीच्या नावे आणखीन एक पुरस्कार झाला आहे. विराट कोहलीला यावर्षीचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटर ऑफ द इयर चा पुरस्कार प्राप्त झाला आहे. विराट तिसऱ्यांदा या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. विराटला याआधी २०११-१२आणि २०१३ -१४ चा क्रिकेटर ऑफ दी इयर चा पुरस्कार प्राप्त झाला होता. विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्माने हा पुरस्कार स्वीकारला.

याबरोबरच भारताचा सलामी फलंदाज शिखर धवन सर्वोत्कृष्ठ आंतराष्ट्रीय फलंदाज पारितोषिकाचा मानकरी ठरला आहे. तर न्यूझीलंडचा ट्रेण्ट बोल्ट हा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय गोलंदाज पारितोषिकाचा मानकरी ठरला आहे. यावेळी जगप्रसिद्ध विकेटकीपर आणि गोलंदाज फारूख इंजीनियर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

भारतीय महिला टीमची खेळाडू ऑलराउंडर हरमनप्रीत कौर ने मागील वर्षी ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध वर्ल्ड कापमध्ये खेळलेल्या नाबाद १७१ च्या इनिंग ला सर्वोत्कृष्ट इनिंगचा पुरस्कार देण्यात आला. याबरोबरच शुभमान गिल ची सर्वोत्कृष्ट अंडर-19 मधील खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.

आणखी काही पुरस्कारांमध्ये अफगाणिस्तानच्या रशीद खान ला सर्वोत्कृष्ट टी 20 गोलंदाचा मान मिळाला. याबरोबरच न्यूझीलंडच्या कोलिन मुनरोला सर्वोत्कृष्ट टी20 च्या फलंदाजाचा मान मिळाला तर वेस्टइंडीज़ चा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेल याला ‘पॉप्युलर चॉईस अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले.