Vishrantwadi Pune Crime | पुणे : प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीवर बलात्कार, लग्नास नकार देणाऱ्या तरुणावर अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Vishrantwadi Pune Crime | तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) तिच्यावर बलात्कार केला (Rape Case Pune). त्यानंतर तिच्यासोबत लग्न करण्यास नकार देऊन तिला जातीवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी (Vishrantwadi Police) एका युवकावर बलात्कार व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा (Atrocity Act) दाखल केला आहे. हा प्रकार डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीत आरोपीच्या व पीडितेच्या घरी घडला आहे.

याबाबत 27 वर्षीय तरुणीने शुक्रवारी (दि.12) विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन कुशल राजेश प्रधान Kushal Rajesh Pradhan (वय-32 रा. स्नेह कुंज अपार्टमेंट, टिंगरेनगर, विश्रांतवाडी) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन, 417, 504, 506 सह अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

महिला पोलीस उपनिरीक्षक सुधा चौधरी (PSi Sudha Chaudhary) यांनी दिलेल्या माहितीनुसार,
फिर्य़ादी व आरोपी पुण्यातील एका बँकेत नोकरी करतात. एकाच ठिकाणी काम करत असल्याने त्यांची ओळख होऊन
मैत्री झाली. कुशल प्रधान याने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवले.
त्याने मुलीला घरी बोलावून घेत तिच्यासोबत शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले.
तसचे तिच्या मुंढवा (Mundhwa) येथील घरी जाऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
मुलीने कुशल याच्याकडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने तिला जातीवाचक शिवीगाळ केली.
तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पीएसआय सुधा चौधरी करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ganeshkhind Road Pune | गणेशखिंड रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादन कायद्यानुसार जागा ताब्यात घेण्याचे काम युद्धपातळीवर

Waste To Energy Plant (Wte) Ramtekdi Pune | रामटेकडी येथील पुणे बायो एनर्जी प्रकल्पात 5 वर्षात कचऱ्यापासून एक युनिट देखील वीज निर्मिती नाही; प्रकल्पात कचऱ्याचे ढीग साठल्याने आरोग्याचा ‘धोका’ वाढला