विश्‍वकर्मा पूजा : आज ‘या’ विधीनुसार करा पुजा, निश्‍चित दर महिन्याला होईल लाखोंची कमाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज भगवान विश्वकर्मा यांची जयंती साजरी केली जात आहे. भगवान विश्वकर्मा यांना जगातील पहिला इंजिनिअर मानण्यात येते. ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार विश्वकर्मा यांनी मोठ्या मोठ्या महानगरांची निर्मिती केली होती, असे सांगण्यात येते. इन्द्रपुरी, द्वारिका, हस्तिनापुर, स्वर्ग लोक, लंका यांसारख्या महानगरांची त्यांनी निर्मिती केल्याचे सांगितले जाते. प्रत्येक कन्या संक्रातीला त्यांची मनोभावे पूजा केली जाते. आज भगवान विश्वकर्मा यांचा जन्मदिवस समजला जातो. त्यामुळे अनेक व्यावसायिक यांची पूजा करत असतात. यामुळे धन धान्यामध्ये वृद्धी पाहायला मिळते. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने पूजा करून महिन्याला लाखो रुपये मिळवू शकता

1) मेष:  भगव्या रंगाची वस्त्र परिधान करून त्याच रंगाचा प्रसाद भगवान विश्वकर्मा यांना दाखवून वाटावा.
2) वृषभ: भगवान विश्वकर्मा यांच्या पूजेनंतर काळ्या रंगाच्या गाईला चारा खाऊ घालावा.
3) मिथुन:  भगवान विश्वकर्मा यांच्या मूर्तीजवळ रांगोळीने सजावट करा, त्यामध्ये हिरवा रंग जास्त प्रमाणात वापरायला हवा.
4) कर्क: भगवान विश्वकर्मा यांच्या पूजेनंतर सफेद अन्नाचे वाटप करावे.
5) सिंह: भगवान विश्वकर्मा यांच्या पूजेनंतर त्यांना गुळाचा नैवद्य दाखवून गरिबांना अन्नदान करावे.
6) कन्या: भगवान विश्वकर्मा यांना लाल रंगाचा प्रसाद दाखवून त्याचे गरीबांमध्ये वाटप करावे.
7) तूळ : विश्वकर्मा पूजेनंतर कामाच्या ठिकाणी असलेल्या कामगारांना प्रसादाचे वाटप करावे.
8) वृश्चिक: भगवान विश्वकर्मा यांना लाल रंगाचा तिलक लावून गोमातेला मसूर डाळ खायला घालावी.
9) धनु: भगवान विश्वकर्मा यांची कृपा व्हावी असे वाटत असेल तर गणपती आणि माता पार्वती यांना वस्त्र चढवा.
10) मकर: विश्वकर्मा पूजेच्या अगोदर व्यवसायाच्या ठिकाणची जागा अगोदर नीट स्वच्छ करावी.
11) कुंभ: भगवान विश्वकर्मा यांना पारिजातकाच्या फुलाचा हार घालावा.
12) मीन: भगवान विश्वकर्मा यांच्या पुजेआगोदर कामाच्या जागी श्री हरि विष्णु यांची पूजा करावी.