ग्रामीण रुग्णालयातील कोरोना केअर सेंटरला नासिक जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट

लासलगाव  : पोलीसनामा ऑनलाइन – लासलगाव ग्रामीण रुग्णालयातील कोरोना केअर सेंटरला नासिक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अशोक थोरात व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत खैरे यांनी भेट देत रुग्णालयाचा आढावा घेत येथील डॉक्टरांशी चर्चा करून रुग्णांची पाहणी केली.

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात कोरोना बाधित रुग्ण संख्या, रुग्णाचा कोरोना उपचार ,ऑक्सिजन पुरवठा नियोजन ,औषधी सामग्री ,आग व्यवस्थापन, मनुष्यबळ व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन डॉ अशोक थोरात यांनी केले.ग्रामीण रुग्णालय लासलगावचे वैद्यकीय अधीक्षक डॉ सतीश सूर्यवंशी , कोरोना नोडल वैद्यकीय अधिकारी डॉ बाळकृष्ण अहिरे व डॉ अविनाश पाटील, मुख्य परिचारीका श्रीमती सविता जाधव व कर्मचारी वर्गाची अधिकाऱ्यांनी संवाद साधत अडीअडचणी जाणून घेत त्यांना मार्गदर्शन केले.

रुग्णालयातील स्वतंत्र कक्ष असलेल्या कोरोना बाधित रुग्णांची आत्मीयतेने चौकशी डॉ थोरात यांनी येथील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने समाधान व्यक्त करत भविष्यात येणाऱ्या तिसऱ्या लाटे संदर्भात उपाय योजना करणे तसेच रुग्णवाहिका यासंदर्भात त्यांनी विविध विषयांवर स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

सध्या स्थितीत वाढत असलेल्या म्युकरमायकोसीस या बुरशीच्या आजाराबद्दल पाठपुरावा करण्यात सांगितले असुन या उपचाराबद्दल मार्गदर्शन केले. लासलगाव ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण प्रवेश व बरे होण्याचे प्रमाण याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी परिचारिका उपस्थित होते.