बाप रे ! वहीदा रहमान यांनी 83 व्या वर्षी केलं Water Snorkeling; फोटो होतोय व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   वय हा केवळ एक आकडा असतो हे ८३ वर्षांच्या ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रहमान यांनी सिद्ध केलं आहे. सध्या सोशल मीडियावर वहीदा यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये वहीदा या सध्या मुलगी काश्वी रेखीसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत असून अंदमानच्या समुद्रातील अंडर वॉटर ची मजा घेत असल्याचे दिसत आहे. वहीदा यांनी समुद्रात स्नोर्कलिंग (Snorkeling) करत त्यांच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत.

काश्वीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अंदमानातील काही फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये वहीदा यांनी मुलीलोबत स्नोर्कलिंग करत असल्याचे दिसत आहे. त्यांचा पाण्याच्या आतील फोटो सध्या खूप व्हायरल झाला आहे.