खुशखबर ! नववर्षात TV पाहणं होणार ‘स्वस्त’, फक्त 130 रूपयांमध्ये मिळणार 200 ‘चॅनल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवीन वर्षात टीव्ही पाहणाऱ्यांची एक चांगली बातमी आहे. कारण नवीन वर्षात टीव्ही पाहणे स्वस्त होणार आहे. येत्या काळात, आपले केबल टीव्ही आणि डीटीएच बिल कमी होईल. टेलिकॉम रेग्युलेटर (TRAI) ने नवीन दर आदेश जारी केला आहे. आता ग्राहकांना नेटवर्क कॅरेज फी म्हणून केवळ १३० रुपये द्यावे लागतील. यात ग्राहकांना २०० मोफत चॅनेल्स मिळतील. तसेच, ब्रॉडकास्टर 19 रुपयांच्या चॅनेल बुलेट देऊ शकणार नाहीत.

ग्राहकांना 33 टक्के सूट मिळणार :
ट्रायने नवीन दर आदेश जारी केला आहे. नेटवर्क क्षमता फी 130 रुपये असेल. 200 फ्री टू एअर चॅनेल 130 रुपयांमध्ये उपलब्ध असतील. 500 फ्री टू एअर चॅनेल 160 रुपयांमध्ये उपलब्ध असतील. इतर टीव्ही कनेक्शनची फी कमी असेल. दुसर्‍या टीव्हीसाठी 52 रुपये फी भरावी लागेल. ब्रॉडकास्टर 19 रुपयांच्या चॅनेल बुके देऊ शकणार नाहीत. केवळ 12 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे चॅनेल दिले जाऊ शकतात. त्यामुळे ग्राहकांसाठी 33 टक्के सूट असेल.

1 मार्च 2020 पासून नवीन दर लागू होणार :
ब्रॉडकास्टर 15 जानेवारीपर्यंत त्यांचे चॅनेल दर बदलतील. 30 जानेवारी पर्यंत सर्व वाहिन्यांची दर यादी पुन्हा प्रसिद्ध केली जाईल. नवीन दर 1 मार्च 2020 पासून लागू होतील. ट्रायने चॅनेलसाठी कॅरेज फी 4 लाख रुपये निश्चित केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मधुमेह असल्यास आहारामध्ये करा ‘या’ ४ पदार्थांचा समावेश
‘हे’ ७ उपाय केल्यास सतत येणारा थकवा जाईल पळून, जाणून घ्या
जेवण पॅक करण्यासाठी ‘फॉईल पेपर’ वापरता ? ‘हे’ ७ दुष्परिणाम जाणून घ्या
मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा !
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
मातेच्या स्तनपानामुळे बाळांना होतात ‘हे’ ६ फायदे, जाणून घ्या
लवंग खाण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?