YouTube & Digital World मधील ‘या’ 5 कलाकारांनी केलीये फिल्मी दुनियेत ‘एन्ट्री’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अनेक युट्युबर्स आणि डिजिटल पर्सनॅलिटीज अशा आहेत ज्यांनी सिनेमात किंवा काम केलं आहे. काहींच्या वाट्याला सिनेमा नव्हे तर शॉर्ट फिल्मही आली आहे. काही वेब सीरिजचा हिस्सा बनताना दिसले आहेत. अशाच काही 5 कलाकारांबद्दल आपण जाणून घेणार आहोत जे युट्युब आणि डिजिटल वर्ल्डमधून सिनेमात किंवा शॉर्ट फिल्म आणि वेब सीरिजमध्ये गेले आहेत आणि खूप फेमसही आहेत.

1) भुवन बाम – युट्युबवर कॉमेडी व्हिडीओज बनवणाऱ्या भुवन बामनं गेल्या काही वर्षांत खूप फेम मिळवलं आहे. टीटू टॉक्स या शोमध्ये शहरुख खाननं एन्ट्री घेतली होती. यावरूनच त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. माईन्स प्लस नावाच्या शॉर्ट फिल्ममध्येही भुवननं काम केलं आहे. यात त्यानं दिव्या दत्ता सोबत स्क्रीन शेअर केली आहे. अलीकडेच भुवन जाकिर खानच्या गाईडन्समध्ये अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवरील स्टँडअप शो वन माईक स्टँड चा हिस्साही बनला होता.

2) दानिश सेठ – दानिश सेठ देखील एक कॉमेडीयन आहे. त्यानं आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे स्पेशल शोजदेखील बनवले आहेत. अलीकडेच त्यानं अ‍ॅमेझॉन प्राईमवरील फीचर फिल्म फ्रेंच बिर्याणी मधून डेब्यू केला आहे. 24 जुलै रोजी ही फिल्म रिलीज झाली आहे.

3) प्राजक्ता कोळी – प्राजक्ता सध्याची फेमस युट्युबर आहे. मोस्टली सेन असं तिच्या चॅनलचं नाव आहे. तिनं बॉलिवूड सेलेब्स करीना कपूर, नवाजुद्दीन सिद्दीकी, विकी कौशल सोबत कोलॅबोरेट केलं आहे. अलीकडेच ती एका शॉर्ट फिल्मचा हिस्सा बनली आहे. ख्याली पुलाव अंस या फिल्मचं नाव आहे.

4) निधी बिस्ट – निधी इंडस्ट्रीत येण्याआधी वकिल होती. युट्युबच्या दुनियेत ती फेमस आहे. टीव्हीएफच्या अनेक व्हिडीओज आणि वेब सीरिजमध्ये ती झळकली आहे. बिस्ट प्लिज हे तर खूप गाजलं आहे. काही काळापासून तर ती सिनेमातही दिसत आहे. अनुष्का शर्माच्या फिल्लौरी सिनेमातून तिनं एन्ट्री केली होती. 2019 साली आलेल्या आयुष्मान खुरानाच्या ड्रीम गर्ल सिनेमातही ती दिसली आहे.

5) सुमुखी सुरेश – सुमुखी सुरेश एक फेमस कॉमेडीयन आहे. तिनं अनेक स्टँड अप कॉमेडी शोमध्ये काम केलं आहे. पुष्पावली या तिच्या वेब सीरिजचीही खूप चर्चा झाली आहे. ही सीरिज अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर रिलीज झाली आहे. याशिवाय तिनं हंबल पॉलिटिशियन नोगराज या साऊथच्या सिनेमातही काम केलं आहे.