Weekly Gold Price | सोने महागले! चांदीची चमक उतरली, जाणून घ्या संपूर्ण आठवड्याची सराफा बाजारची स्थिती

नवी दिल्ली : Weekly Gold Price | भारतीय सराफा बाजारात या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी दिसून आली आहे. तर चांदीच्या दरात घसरण झाली. या व्यवहाराच्या आठवड्यात सोन्याच्या भावात ६९० रुपये प्रति १० ग्रॅमची तेजी नोंदली गेली, तर चांदीच्या दरात १,०९५ रुपये प्रति किलोग्रॅमची घसरण झाली आहे. (Gold Silver Price)

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन म्हणजेच आयबीजेएच्या वेबसाईटनुसार या बिझनेस वीकच्या सुरुवातीला सोमवारी, १० जूनला २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,१७६ होता, जो शुक्रवारी, १४ जूनपर्यंत वाढून ७१,८६६ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला. तर, ९९९ शुद्धतेच्या चांदीचा दर ८८,९२८ वरून वाढून ८७,८३३ रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला.

आयबीजेएकडून जारी दरातून वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या स्टँडर्ड भावाची माहिती मिळते. हे सर्व दर टॅक्स आणि मेकिंग चार्जच्या आधीच्या असतात. आयबीजीएद्वारे जारी दर देशभरात सर्वमान्य आहेत, परंतु या दरात जीएसटीचा समावेश केला जात नाही.

मागील एक आठवड्यात किती बदलला सोन्याचा दर

१० जून, २०२४ – ७१,१७६ रुपये प्रति १० ग्रॅम
११ जून, २०२४ – ७१,४४५ रुपये प्रति १० ग्रॅम
१२ जून, २०२४ – ७१,५८० रुपये प्रति १० ग्रॅम
१३ जून, २०२४ – ७२,५१३ रुपये प्रति १० ग्रॅम
१४ जून, २०२४ – ७१,८६६ रुपये प्रति १० ग्रॅम

मागील आठवड्यात किती बदलला चांदीचा दर
१० जून, २०२४ – ८८,९२८ रुपये प्रति किलोग्रॅम
११ जून, २०२४ – ८७,७०८ रुपये प्रति किलोग्रॅम
१२ जून, २०२४ – ८८,१९२ रुपये प्रति किलोग्रॅम
१३ जून, २०२४ – ८७,८४७ रुपये प्रति किलोग्रॅम
१४ जून, २०२४ – ८७,८३३ रुपये प्रति किलोग्रॅम

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dattatray Bharne | आमदार दत्तात्रय भरणे यांना सायबर चोरट्यांनी बनवलं ‘मामा’, अपघाताची बतावणी करुन घातला गंडा

Sinhagad Road Pune Crime News | पुणे : वाहन चोरी करणाऱ्या दाम्पत्याला सिंहगड पोलिसांकडून अटक, 8 चारचाकी व 9 दुचाकी जप्त (Video)