परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे ‘गुलाब पुष्प’ देऊन स्वागत

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले. विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर उरुळी कांचन व परिसरातील एकूण एक हजार सहा विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित असल्याची माहिती केंद्रसंचालक डॉ. संजय भागवत यांनी दिली.

यामध्ये ऊरुळी कांचन येथील महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेज, खांमगाव (ता. दौड) येथील खंबेश्वर न्यु इंग्लिश स्कुल, वाघापुर (ता. पुरंदर) येथील पंचर्केषी तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यावेळी उपकेंद्रसंचालक डॉ. संजय जगताप, रश्मी कुलकर्णी, रामदास रसाळ, संजय कांबळे, धनाजी ठाकरे, नवनाथ कांचन आदि प्राध्यापक उपस्थित होते.

हेही वाचा – 12 वी परीक्षा : ‘या’ केंद्रावर व्यवस्थेचे ‘तीन तेरा’ 

लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर ज्युनिअर कॉलेज येथील अनुक्रमे पाचशे साठ व दोनशे शहात्तर असे एकूण आठशे छत्तीस विद्यार्थी उपस्थित असल्याची माहिती केंद्र संचालक कृष्णानंद डकरे व जगदीप तिकोने यांनी दिली. पृथ्वीराज कपुर मेमोरियल हायस्कुल व ज्युनिअर क़ॉलेजसह एमआयटी ज्युनिअर कॉलेज, एंजल हायस्कुल व थेऊर येथील चिंतामणी हायस्कुलचे विध्यार्थी परीक्षा देत आहेत.

यावेळी प्राचार्य सिताराम गवळी, उपकेंद्रसंचालक अर्जुन कचरे, सदानंद साळुंके, प्राध्यापक उपस्थित होते. दरम्यान लोणी काळभोर पोलिसांच्या वतीने उरुळी कांचन व लोणी काळभोर या दोन्ही परीक्षा केंद्रावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Loading...
You might also like